Dipti-Dhotre
Dipti-Dhotre 
health-fitness-wellness

दीप्ती धोत्रे फिटनेसच्या बाबतीत कशी घेते दक्षता ते वाचा..

दीप्ती धोत्रे

स्लिम फिट - दीप्ती धोत्रे, अभिनेत्री
स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामाप्रमाणेच आहाराकडेही अधिक लक्ष देणे फार आवश्‍यक आहे. व्यायामही तितकाच महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी तर या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आहाराबद्दल सांगायचे तर; सकाळी उठल्यानंतर किती वेळाच्या आत तुम्ही नाश्‍ता करता, हे फार महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळी असल्याने आहार किंवा व्यायाम करण्याची पद्धत वेगळी असते. मी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम फळे खाते. त्यानंतर नाश्‍ता करते. मला उपाशी राहिलेले आवडत नाही, त्यामुळे मला भूक लागल्यावर मी काहीतरी खाते. मी फास्टफूड, इतर तेलकट पदार्थ खाणे शक्‍यतो टाळते. मी घरची पोळी-भाजी खाणे जास्त पसंत करते. शरीर फिट ठेवण्यासाठी व्यायामाचीही तितकीच गरज असते. गेली तीन वर्षे मी जिम्नॅस्टिक्स शिकत आहे. जिम्नॅस्टिक्स हा योगाचा दुसरा प्रकार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

शिवाय मी जिमलाही जाते. मेडिटेशनची सगळ्यांना फार आवश्‍यकता असते आणि आम्हा कलाकारांना व्यग्र वेळापत्रक व ताणामुळे त्याची फारच गरज असते. आम्हाला कधीकधी अगदी २४ तास चित्रीकरण करावे लागते, अशा वेळी मी यू-ट्यूबवर गाणी ऐकून किंवा जिम्नॅस्टिक्स करून स्वतःचा स्ट्रेस दूर करण्याचा प्रयत्न करते. आता मी लवकरच ‘विजेता’ या मल्टिस्टार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मी लांब उडी घेणे हा खेळ खेळण्यात फारच तरबेज असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील माझ्या या भूमिकेकरिता फिट राहण्यासाठी मला अतिदक्षता घ्यावी लागली. मी फिटनेसच्या बाबतीत दक्ष असूनही मला ‘विजेता’ चित्रपटातील भूमिकेत लांब उडीतील कसब पडद्यावर साकारायचे असल्याने विशेष मेहनत घ्यावी लागली. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचे व्हिडिओ पाहून मी स्वतःच ट्रेनिंग घेतले आहे.

(शब्दांकन - स्नेहा गांवकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Heat Wave: शरीरामधील उष्णतेत होते वाढ; जडतात मूळव्याध, ॲसिडिटीसारखे आजार

SCROLL FOR NEXT