smile health tips 
health-fitness-wellness

Smile Please! चेहऱ्यावरचं गोड हसू आरोग्यासाठी लाभदायक 

सकाळ वृत्तसेवा

हसल्याने आय़ुष्य वाढतं म्हणतात. खरंतर हसू आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं. चेहऱ्यावर स्माइलमुळे सुंदरतेत भर पडते आणि त्यासोबत इतरही फायदे होतात. पोटाची चरबी कमी होते. सतत हसरा चेहरा ठेवल्यानं चेहऱ्याचे स्नायु मजबुत होतात आणि चेहरा सुंदर दिसतो. 

हसण्यामुळे चेहऱ्याच्या अनेक स्नायुंवर परिणाम होतो. ते ताणले गेल्यानं चेहऱ्यामध्ये असलेल्या रक्तपेशींमध्ये रक्ताभिसरण वाढते. यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळीसुद्धा वाढते. 

ऑक्सिजनची पातळी आणि वाढलेलं रक्ताभिसरण यामुळे चेहऱ्यावर तेजही येतं. यामुळे एक सकारात्मक उर्जाही तयार होते. यामुळे नैराश्य, चिंता कमी व्हायला मदत होते. 

सामान्यपणे शरीरात चेहऱ्यावर आणि पोटाला चरबीचा त्रास होतो. चरबी वाढण्याचं कारण शरीरात वाढलेलं कॉर्टिसोल हार्मोन हे असतं. 

कॉर्टिसोल हार्मोन वाढल्यानं शरीराचे स्नायु ढिले पडल्यासारखे दिसतात. यामुळे चरबी वाढल्यासारखी दिसते. जेव्हा आपण चिंतामुक्त असतो तेव्हा चेहऱ्यावर एक गोड हसू असतं. त्यावेळी चेहऱ्याच्या स्नायुंचा व्यायाम होतो. ऑक्सिजनचं प्रमाण वाढत जातं. 

ऑक्सिजन वाढत जातो तसा ताण कमी होतो आणि शरीरात कॉर्टिसोलही कमी होतं. तसंच मेंदुमध्ये डोपामाइनचं सिक्रेशन वाढतं. डोपामाइन हे एक असं हार्मोन आहे जे आपल्याला आनंदी रहायला मदत करतं. 

आपल्याला कितीही त्रास असला त्यावेळी थोडंस हसू खूप मोठी मदत करतं. आपला ताण कमी करण्यासाठी आणि शरिराचा, मेंदुचा थकवा कमी होण्यासाठी ते उपयोगी पडतं. कठीण काळातही चेहऱ्यावर हसू ठेवलं तर बऱ्याच समस्या सुटतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT