बदलत्या जीवनशैलीत व्यायाम हे जीवनाचे अविभाज्य अंग असले पाहिजे. आणि अनेकांनी ती जीवनशैली अंगिकारली आहे. मात्र अनेकांना व्यायाम केल्यानंतर शरीरामध्ये वेदना होत असतात. काही लोक तर सतत वर्कआऊट करतात. त्यामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये प्रचंड वेदना होत असतात. व्यायामानंतर होणाऱ्या वेदनांमुळे लोक व्यायाम करणंच बंद करतात. या वेदनांपासून सुटका करून घ्यायची असेल तर काही घरगुती उपाय करता येतात.
व्यायामामुळे शरीरात वेदना होतातच शिवाय अनेक महिलांना मासिक पाळीमध्ये तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांमुळे महिला आपलं काम व्यवस्थितपणे करू शकत नाही. या दोन्ही मध्ये होणाऱ्या वेदनांपासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरणारा रामबाण उपाय म्हणजे मेथीचे दाणे.
मेथीमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथीचा खूप फायदा होतो. मेथीमध्ये मुबलक प्रमाणात आयर्न आढळून येते. जे महिलांसाठी अत्यंत आवश्यक असते.
जाणून घेऊया मेथीच्या दाण्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चहाविषयी.
या चहाचे सेवन केल्यास व्यायामानंतर होणाऱ्या वेदना आणि मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतील.
तरुणींना आणि महिलांना मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो. अशांसाठी मेथीच्या दाण्यापासून तयार केलेला चहा फायदेशीर ठरतो. या चहामुळे पोटाच्या समस्यासुध्दा कमी होतात.
सविस्तर वाचा - खासदार नवनीत राणा यांना नागपूरला हलविले
असा तयार करा मेथीच्या दाण्यापासून चहा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.