Heatstroke Prevention Tips, Summer Care Tips in Marathi, Tips to avoid heatstroke, Tips to avoid heatstroke in summer
Heatstroke Prevention Tips, Summer Care Tips in Marathi, Tips to avoid heatstroke, Tips to avoid heatstroke in summer Sakal
health-fitness-wellness

Heatstroke: उन्हाळ्यात रहा ठंडा ठंडा कूल कूल! उष्माघातापासून होईल संरक्षण

केवल जीवनतारे @kewalsakal

Heatstroke Prevention Tips: उकाडा हा साऱ्यांनाच नकोसा वाटतो. उन्हाळ्यातली कडकडीत उन्हाची काहिली अंगावर येते, त्यामुळे सारेच त्रस्त होतात. मार्च ते मे महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे चटके घाम फोडतात. त्रासदायक असा हा उन्हाळा अनारोग्याला कारणीभूत ठरतो. गॅस्ट्रोपासून तर उष्माघातापर्यंतच्या आरोग्याच्या अनेक समस्या डोकं वर काढतात. अल्प श्रमानेही उन्हाळ्यात थकवा जाणवतो. शरीराची त्वचा काळवंडते. शरीरातून घामावाटे जीवनावश्‍यक सोडियम पोटॅशियम, पाणी बाहेर टाकले जाते आणि पोषक घटकांचा नाश होतो. गोवर, कांजण्या, नागीणसह गॅस्ट्रो, उष्माघाताचा मोठा धोका असतो, अशी माहिती वैद्यकतज्ज्ञांनी दिली. (Stay cool in the summer cool cool cool! Tips to protect from heatstroke)

विशेषत: शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे उष्माघाताची सर्वाधिक जोखीम अधिक असते. अतिसार, लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. कडक उन्हात जास्त काळ काम केल्याने, उन्हात फिरल्याने शरीराची उष्णता वाढते. उष्माघातामुळे व्यक्ती मुर्छित होण्याची शक्‍यता असते. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसह बाहेर पडू नका, असा सल्ला जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शांतीदास लुंगे यांनी दिला. (Heatstroke Prevention Tips in Marathi)

उष्माघात टाळण्यासाठी-

  • डोक्‍याला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडा

  • उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नका

  • ताप असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषध घ्या

  • टरबूज, कांदा, खरबूज यांचा जास्त वापर करा

  • उष्माघाताची लक्षणे

  • तीव्र ताप येणे

  • तीव्र डोकेदुखी

  • डोळ्यांमध्ये जळजळ

  • वारंवार तहान लागणे

हे करा-

  • थंड पाण्याचा वापर

  • कांद्याचा रस तळपायाला लावणे

  • लिंबू-पाणी अधिकाधिक पिणे

  • उन्हात घराबाहेर पडू नये

  • आवळा, कोकम आणि ताक प्यावे

  • बेलाचा रस उष्णता नियंत्रणात प्रभावी ठरतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT