health-fitness-wellness

STD symptoms: डोळ्यातून दिसतात आजाराची सुरुवातीची लक्षणं

सकाळ डिजिटल टीम

STD symptoms: 2019 मध्ये STI चे प्रमाण प्रति 100,000 लोकसंख्येमागे 832 केसेस होते, जी मागील चार वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. 2010 पासून गोनोरिया, सिफिलीस आणि नागीणची वार्षिक प्रकरणे वाढत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा रोग एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर परिणाम करतो आणि या तीन लक्षणांपैकी कोणतीही एक चेतावणी म्हणून ओळखली जाते.

STD symptoms: सेक्सबाबत चर्चा करताना नेहमी पौगंडावस्था (adolescence) आणि प्रौढत्व (adulthood) आणि विशेषत: सुरक्षित (specifically safe sex)बाबत उल्लेख होतो पण काही लक्षण ही लैंगिक संक्रमित रोगाची (Sexually transmitted diseases- STD)असू शकतात जी लोकांच्या लक्षात येत नाही.

STD चे अत्यंत गंभीर (extremely serious)आणि आश्चर्यकारक दुष्परिणाम (side effect)तुमच्या डोळ्यांवर आणि दृष्टीवर होऊ शकतात.

याबाबत Express.co.uk ला तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट रोशनी पटेल सांगितले की, या डोळ्यांमध्ये आढळून येणारा आजार हा पहिला धोक्याचा इशारा आहे.

सिफिलीस हा एक STD आहे ज्यामुळे शरीरावर पुरळ(rashes)किंवा फोड (sores)येतात. या विषाणूचे एकदा संक्रमण झाल्यावर संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो, जो उशीरा ट्रीटमेंट सुरु केल्यावर संरक्षित केला जाऊ शकत नाही. जेव्हा सिफिलीसचा डोळ्यांवर परिणाम होतो, तेव्हा डोळे खूप लाल होणे, डोळ्यांची आग होणे,ऑप्टिक नर्व्ह रोग होणे आणि अंधत्वही येऊ शकते. यासाठी इंट्राव्हेनस अँटीबायोटिक्सचा उपचार करण्याचा सल्ला दिला जातो.

"सुरक्षित लैंगिक संबध ठेवणे अत्यंत महत्वाचे असून लैंगिक संक्रमित रोगांपासून (STD)व्यक्तींचे संरक्षण करू शकते," असेही रोशनी यांनी सांगितले.

"काही एसटीडी लक्षणे दिसत नाही पण संक्रमण होऊ शकते, ज्यावर उपचार न केल्यास, गंभीर आरोग्य-संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि ज्याचा परिणाम डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो आणि अंधत्व देखील येऊ शकतो."

एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर कोणत्या लैंगिक रोग झाल्यास परिणाम होतात याबद्दल विचारले असता, रोशनी म्हणाली, की “नागीण (Herpes)मुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात. नागीण विषाणू (herpes virus) सुप्त स्थितीत असतो आणि त्यामुळे नागीण-संबंधित डोळ्यांचे संक्रमण कालांतराने पुनरावृत्ती होऊ शकते.

“क्लॅमिडीया ट्रॅकोमाटिस हा आणखी एक सामान्य एसटीडी आहे, ज्यात ट्रकोमा जिवाणू संसर्गामुळे डोळ्यांवर परिणाम करणारा होऊ शकतो.

ट्रकोमावर उपचार घेतले नाही तर हायजीन संबधित आजार क्लॅमिडीया होऊ शकतो ज्यामुळे अंशिक दृष्टी कमी होणे किंवा अंधत्व येऊ शके. ट्रकोमा हा आजार अनेक देशांमध्ये दुर्मिळ आहे आणि सहसा विकनसनशील देशांमध्ये आढळून येतो.

"सर्वसाधारणपणे गोनोरियाने(Gonorrhoea) ग्रस्त असलेल्यांमध्ये लैगिंक संबधानंतर शरीराच्या अवयवावर परिणाम होतो, त्यांच्या डोळ्यांवर देखील परिणाम होऊ शकतो."

STDची लक्षणे :

डोळे लाल किंवा संवेदनशील होणे

ही लक्षणे दिसू येण्यासाठई ४ ते ५ दिवस लागतात किंवा ते एकादिवसानंतर किंवा एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीनेही दिसून येतात असे रोशनी यांनी सांगितले.

या आजाराच्या संसर्गाबाबत आणि डोळ्यांसंबधित लक्षणांबाबत दिसून येणारी सामान्य लक्षणे

- पिवळा/हिरवा रंगाचा जाडसर स्त्राव दिसू शकतो;

- प्रकाशाची संवेदनशीलता

- डोळ्यांमध्ये किंवा आजूबाजूला वेदना जाणवणे किंवा लालसरपणा येणे

"डोळ्याचा गोनोरिया (Gonorrhoea) प्रौढांमध्ये ( Adultds)अत्यंत दुर्मिळ आहे परंतु तुम्हाला असे वाटत असल्यास, शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचार घेणे महत्वाचे आहे जेणेकरून तुमच्यासाठी योग्य उपचार योजना तयार केली जाईल."

कंडोम वापरणे आणि ओरल सेक्स बॅरिअरचा वापर केल्याने तुम्हाला एसटीडीचा संसर्ग टाळण्यास मदत होईल जर तुम्ही स्थानिक आरोग्य क्लिनिकमध्ये नियमितपणे चाचणी करत असाल, तुम्हाला STD असेल तर त्याचे लवकर निदान होईल.

अचूक एचआयव्ही STD चाचणीचे प्रवक्ते म्हणाले: “गेल्या दोन वर्षांत, जवळच्या शारीरिक संपर्काशिवायही विषाणू किती सहजपणे पसरतो हे आम्ही पाहिले आहे. "म्हणून, जागरूक राहणे आणि त्यांच्या लैंगिक आरोग्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सर्वोत्तम मार्गांबद्दल लोकांना जाणून घेणे नेहमीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT