smoking  sakal media
health-fitness-wellness

धुम्रपान तुम्ही करताय! परिणाम नातवंड भोगतील, रिसर्चमधून नवी माहिती उघड

जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

धुम्रपान केल्याने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात असे आपण एेकतो. अनेकजण तणाव कमी करण्यासाठीही धुम्रपान (Smoking) करतात. पण धुम्रपान केल्याने वजन वाढल्याचे (Weight Gain) तुम्ही कधी एेकले आहे का? म्हणजे बघा हं. धुम्रपान तुमचे आजोबा करायचे पण इथे वजन तुम्हा मुलींचं वाढतंय. हे कसं शक्य आहे. तर, ज्या मुलींचे आजोबा किंवा पणजोबा तारुण्यात धूम्रपान करायचे, त्या मुलींच्या शरीरातील चरबी (Fat) वाढलेली असते. युनायटेड किंगडममधील 90 च्या दशकातील 30 वर्षांच्या मुलांवर केलेल्या संशोधनात ही बाब उघड झाली आहे.

याविषयी मागील काही अभ्यासात (Study) असे दिसून आले आहे की प्रजननापूर्वी काही रसायनांच्या संपर्कात आलेल्या पुरूषांच्या संततीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण, हे असे घडणे पुरूषांमध्ये आहे की नाही तसेच इतर घटकांद्वारे कोणतेही परिणाम अधिक सहजपणे स्पष्ट केले जाऊ शकतात की नाही याबद्दल शंका होती. जर्नल सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला. या अभ्यासात, जर आजोबांनी त्यांच्या बालपणाच्या (१३१६ वर्षांच्या) तुलनेत तारुण्यपूर्व काळात धूम्रपान सुरू केले असेल, तर त्यांच्या नातवंडांमध्ये, जास्त चरबी आढळल्याचा पुरावा होता.

Smoking

अभ्यासात काय आढळले?

या अहवालाचे प्रमुख लेखक प्राध्यापक जीन गोल्डिंग म्हणाले की, या अभ्यासात दोन महत्वाचे परिणाम आम्हाला दिसले. पहिला म्हणजे तारूण्याआधी एखादा मुलगा विशिष्ट पदार्थांच्या संपर्कात आला तर त्याच्या पुढील पिढ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुसरे म्हणजे, मुलांचे वजन जास्त असण्याचे एक कारण म्हणजे त्याचा सध्याचा आहार किंवा व्यायाम यांचा फारसा संबंध नसून त्याच्या पूर्वजांची जीवनशैली आणि संबंधित घटकांचा समावेश त्यासाठी जास्त आहे. असे

smoking

असे आहेत निष्कर्ष

ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मानवांमध्ये प्रीप्युबर्टल एक्सपोजरच्या परिणामांची तपासणी करण्यासाठी, 14,000 लोकांचा अभ्यास केला. ज्या स्त्रियांच्या आजोबांनी किंवा पणजोबांनी वयाच्या 13 व्या वर्षी धूम्रपान करण्यास सुरुवात केली होती अशा स्त्रियांच्या शरीरात चरबी जास्त आढळली.मात्र, पुरुषांमध्ये अशी कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

2014 सालच्या आधी केलेल्या संशोधनात, त्यांना असे आढळले की, जर एखाद्या मुलीच्या वडिलांनी वयाच्या११ वर्षांच्या आधी नियमितपणे धूम्रपान करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या मुलींच्या शरीरात प्रमाणापेक्षा जास्त चरबी होती. हे नवीन संशोधन त्याचा पुढचा भाग होते. भविष्यात आमचा डेटा हा निष्कर्षाला बळकटी देतो की, चार पिढ्यांपर्यंत विस्तारित ट्रान्सजनरेशनल प्रभावाचे हे पहिले मानवी प्रदर्शन आहे, असे अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT