Quitting Smoking  esakal
health-fitness-wellness

सिगरेट सोडण्याच्या घरगुती TIPS; होतील अनेक फायदे

अनेक लोकं स्ट्रेस घालविण्यासाठी सिगरटे पितात

सकाळ डिजिटल टीम

अनेक लोकं स्ट्रेस, फस्र्ट्रेशन घालविण्यासाठी सिगरटे (Cigrate) पितात. कधी कधी दिवसाला ५-६ सिगरेट्स प्यायला जातात. हे प्रमाण कधी वाढते त्यांचे त्यांनाच कळत नाही. मग शरीरावर (Body Effect) त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले की सिगरेट जास्त पितोय याची जाणीव व्हायला लागते. पण ही सवय कशी सो़डावी तेच कळत नाही. सिगरेटचा धूर ओढणाऱ्या व्यक्तीला त्रासदायक ठरतोच. पण त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही त्रास होतो. कळतं पण वळत नाही अशा स्थितीतही तुम्ही येता. पण सिगरेटचे व्यसन मनापासून सोडावेसे वाटत असेल तर काही घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात.

Quitting Smoking

असे आहेत घरगुती उपाय

- सिगरेट सोडायची असेल तर अधी व्यायाम सुरू करा. यामुळे श्वसन प्रणाली मजबूत होते. यासोबत फुफ्फुसात जमा होणारे निकोटिन कमी होते.

- दूधापासून तयार झालेली उत्पादने खाऊ नका.

- फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी हायड्रेड राहणे गरजेचे आहे. यासाठी दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. असे केल्याने फुफ्फुसात जमा झालेले श्लेष पातळ होते. यासाठी चहा किंवा गरम पाणी प्यायल्यात वायुमार्ग साफ होतो.

सिगरेट ओढणाऱ्या लोकांच्या फुफ्पुसाला सूज येते. त्यामुळे श्वास घेणे कठीण होते. अशावेळी ब्लुबेरी, चॅरी, पालक, बदाम आणि ऑलिव्ह हे दाहक विरोधी पदार्थ खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते. तसेच ग्रीन टी प्यायल्यानेही फायदा होतो.

रोज एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मथ घालून प्यायल्यानेही सिगरेटची सवय सुटू शकते.

जर तुम्ही चेनस्मोकर असाल तर किसलेला मुळा खा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

ओट्स (Oats) खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर येतात. त्यामुळे सिगरेट ओढण्याची सवय कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी नाश्त्याला ओट्स नक्की खावेत.

रस्त्यावरून जाताना सिगरेच ओढावाीशी वाटली तर लिकोरिस दात सोबत ठेवा. जेव्हा जास्त सिगरेट ओढावी वाटत असेल तेव्हा चघळायला सुरुवात करावी. असे केल्याने तुमची इच्छा कमी होईल.

Quitting Smoking

धुम्रपान सोडण्यामुळे होतील हे फायदे (Quitting Smoking)

२० मिनिटं- रक्तदाबासोबतच हृदयाची गती स्थिर होते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

८ तास- रक्तामध्ये असलेले निकोटीन आणि कार्बन मोनोक्साईडचा स्तर अर्धा होतो. त्यामुळे ऑक्सिजनचा स्तर सामान्य व्हायला सुरू झाल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.

१२ तास - रक्तातील कार्बन मोनोऑक्साइडचा स्तर सामान्य होतो.

२४ तास- कार्बन मोनोऑरक्साईड पूर्ण काढून टाकला जातो. यादरम्यान येणारा खोकला मलबा साफ करतो.

७२ तास- या दरम्यान फुफ्फुसे जास्त हवा पंप करतात. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते.

१ ते २ आठवडे - फुफ्फुसाचे कार्य आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते.

१ महिना- ब्लड सर्क्युलेशन चांगले झाल्यान त्याचा त्वचेला फायदा होतो. त्यामुळे सुरकुत्या कमी होतात.

१ वर्ष - हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत निम्म्याने कमी होतो.

१५ वर्ष- हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका धुम्रपान न करणाऱ्यांना असतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT