health-fitness-wellness

चला, आरोग्य जपूया...  : चिडचिड, थोडी कमीच करा! 

सकाळवृत्तसेवा

चिंता आणि तणाव आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करतात. लॉकडाऊन काळात घराबाहेर न पडता आल्याने अनेकांना चिडचिडेपणाला सामोरे जावे लागले. घरातील सदस्यांवर, कुटुंबावर विनाकारण चिडचिड होत असल्याचे अनेकांना जाणवले. अनेकांना मला काही काम करता येत नाही. बाहेर जाता येत नाही, अनेक अर्धवट राहिलेली कामेही पूर्ण करता येत नाहीत, अशा विचारांमुळे असहाय्यतेची भावना मनात निर्माण होत होती. त्यामुळे निराशेला सामोरे जावे लागत आहे. या सर्व मानसिक आजारांना दूर ठेवण्यासाठी हलक्‍या फुलक्‍या गोष्टी करता येऊ शकतात. 

लक्षणे जाणून घ्या... 
- चिंताग्रस्त होणे, चिडचिडेपणा वाढणे, निराश वाटणे. 
- काम करण्यात रस न वाटणे. 
- शांत झोप न येणे, झोपल्यास खूप लवकर जाग येणे. 
- मध्येच थकवा येणे किंवा सतत गळून गेल्यासारखे वाटणे. 

हे लक्षात घ्या... 
- परिस्थिती समजून घ्या. बाहेर घडणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्यामुळे झाल्यात का? असा विचार करा. ही परिस्थिती सुरळीत करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता, याचा विचार करा. 
- अनेकदा ही परिस्थिती स्वीकारली नसल्यामुळे चिडचिडेपणा वाढतो. त्यामुळे स्वीकारार्ह वृत्ती तयार करा. 
- वास्तववादी, सकारात्मक विचार करा. स्वतःच्या भावना, विचार समजून घ्या. 
- ध्यानधारणा, दीर्घ श्‍वसन ताण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 
- परिस्थितीशी मिळतेजुळते घेण्याचा प्रयत्न करून परिस्थिती हाताळू शकता. 
- नियमित व्यायाम, योग, फिरणे, पोहणे, नृत्य यामुळे शरीर सैलावते. तणाव कमी होतो. 
- कौटुंबिक आयुष्य, छंद, मनोरंजन, वैयक्तिक जबाबदाऱ्या, मनन-चिंतन यासाठी वेळ देऊन त्यात समतोल साधावा. 
- ताणतणावाच्या व्यवस्थापनात स्वतःच्या भावनांना आवर घालणे महत्वाचे ठरते. शाब्दिक प्रतिक्रियापेक्षा देहबोलीचा वापर करावा. आपल्याला आलेला राग चढ्या आवाजात व्यक्त करण्याऐवजी खुबीने शांत स्वरात मांडावा. 

पुणे कोरोना

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्याच्या काळातील परिस्थिती समजून घेऊन भविष्याचा वेध घ्यायला हवा. मोकळ्या वेळेत चिंतन, मनन करण्यावर भर द्या. ठराविक वेळेत व्यायाम, दीर्घ श्‍वसन आणि योगासने करा. 
- आम्रपाली रोहिदास, समुपदेशक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT