Take care when exercising in the summer 
health-fitness-wellness

उन्हाळ्यात व्यायाम करताना घ्या काळजी

सकाळवृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच चढायला लागलाय. त्यानुसार आहारात आणि थंडी सरली असून आता उन्हाचा तडका वाढतोय. या काळात काय खावं प्यावं हे जसं महत्त्वाचं तसंच या काळात व्यायामाचीही काही पथ्ये आहेत. त्यासाठीच्या काही टिप्स 

उन्हाने शरीर थकते. अशावेळी शरीर सतत सक्रिय राहील याची काळजी घ्या. पोहणे, बॅडमिंटन, सायकलिंग यासारख्या खेळांचा व्यायाम म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो. पोहण्यासाठी हा उत्तम काळ आहे. सांधे आणि हाडांवर फारसा ताण न येता करता येण्याजोगा उत्तम व्यायाम आहे. 

चालणं- जॉगिंग ट्रॅक्‍स, रस्ते, बीच असे अनेक पर्याय चालण्यासाठी उपलब्ध आहेत. बाहेर मोकळ्या वातावरणात चालायला आवडत नसेल. ट्रेडमिलसारख्या पर्यायांचादेखील तुम्ही विचार करू शकता. 

प्राणायाम आणि योग योगासने हा व्यायामासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणता येईल. प्राणायामाची योग्य साथ लाभल्यास, उन्हाळ्यात हा व्यायाम सर्वोत्तमच ठरतो. 

या काळात उष्माघात, चक्कर येणं असे त्रास होऊ शकतात. यामुळे शक्‍यतो सकाळी लवकर अथवा सायंकाळची वेळ व्यायामासाठी निवडा. वातानुकूलित जिम असेल तर उत्तमच. 

योगासने करण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे योगासनं करताना मधून मधून थोडं पाणी प्या. थकवा असेल तर योगासने टाळा. कोणताही त्रास किंवा दुखणं सुरू असेल तरीही योगासने टाळून आधी डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. 

योगासनाआधी कोणतंही पेय किंवा खाल्ले असल्यास किमान अर्धा तास तरी जाऊ द्यावा. जेवणाच्या आधी दोन तास आणि नंतर चार तासांनी आसनं करावीत. आसने करताना घट्ट कपडे घालू नयेत. स्वच्छ, सैलसर कपडे घालावेत. 

उन्हाळ्यात शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम बाहेर पडतो. त्यामुळे थकवा जाणवतो. नियमित व्यायाम करीत असाल तर त्याच गतीने व्यायाम सुरू ठेवण्याऐवजी आठवड्यात एखाद दुसरा दिवस व्यायामाला सुटी दिली तरी चालेल. शक्‍य तेव्हा विश्रांती घ्या. ऊर्जा कायम ठेवून व्यायामाला प्राधान्य द्या. 

तळलेले पदार्थ अधिक खाऊ नका. खाणे कमी करून पेयांचे सेवन अधिक करावे. त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही अर्थात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहील. 

व्यायामानंतर शरीरातील पाणी कमी होण्याची शक्‍यता असते. शरीर थकते. त्यामुळे व्यायाम करतानाही तुम्हाला शरीरातील पाणी कमी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे लागेल. दीड ते दोन तासांच्या व्यायाम सत्रात कमीत कमी एक ते दीड लिटर पाणी जरूर घ्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT