winter-tips 
health-fitness-wellness

हिवाळ्यात  स्वतःला जपा!

सकाळ वृत्तसेवा
  • पावसाळा संपून हिवाळा जाणवू लागला आहे. हळूहळू ही थंडी वाढत जाईल. त्यामुळे वेळेवर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे घाला. लहान मुलांना मोजे, हातमोजेही घाला.
     
  • हिवाळ्यात एका वर्षाखालील मुलांची खास काळजी घेणे गरजेचे असते. त्यांची छाती, पाठ, कपाळ, कानशिले सकाळी आणि रात्री हलक्या गरम कापडाने शेकल्यास त्यांना सर्दी होण्याचे प्रमाण कमी होते. 
     
  • थंडीमध्ये हात धुण्याचीही काळजी घ्यावी. सर्दीचे विषाणू हातांवाटे श्‍वासात जाऊन सर्दी होते. हात धुतल्यास हे प्रमाण बरेच कमी होते.   

      'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
     
  • गरम पाण्याची वाफ घेणे, कोमट पाण्याच्या गुळण्या करणे याचादेखील सर्दी-खोकला आटोक्यात आणायला उपयोग होतो. 
     
  • थंडी वाढू लागल्यावर संधिवात असलेल्यांना तसेच सांध्यांचे काही दुखणे असणाऱ्यांना त्रास होऊ लागतो. दुखणे बरे झाले असले तरी थंडीमुळे त्याच्या वेदना वाढू लागतात. अशावेळी गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेतल्यास बरे वाटू शकते. वेदना जास्त होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
     
  • थंडीत केसदेखील कोरडे पडतात. त्यामुळे शाम्पूचा वापर टाळावा. केसांना झोपण्यापूर्वी तेल लावावे अथवा केस धुतल्यानंतर लावायचे क्रीम लावावे. यामुळे केस मऊ राहतील. 
     
  • थंडीत त्वचाही कोरडी पडते. यामुळे अंघोळीला खूप गरम पाणी न वापरता कोमट पाणी वापरावे. वासाच्या साबणाऐवजी मॉइश्‍चरायझिंग साबण किंवा तेल नसलेला ग्लिसरीन साबण वापरावा. साधा साबण वापरल्यास कोरड्या त्वचेला भेगा पडतात आणि खाजही खूप येऊ लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT