ten minute golden morning rules to charge your body
ten minute golden morning rules to charge your body  
health-fitness-wellness

तुम्ही स्वतःच्या शरीराला पूर्ण दिवस चार्ज करु इच्छिता, तर या लेखातील पाच नियमांचा अवलंब करा

सकाळ डिजिटल टीम

काही लोक सकाळी उशीरापर्यंत झोपतात. उठल्यानंतर मोबाईलवर अनेक तास आपला वेळ घालवत असतात. असे केल्याने पूर्ण दिवस वाया जातो. तसेच ऊर्जाही कमी होऊन जाते. तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे वाटत राहते. यामुळे तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या सवयी लावून करावी लागेल. यामुळे तुम्हाला फायदा होईल. प्रत्येक दिवस चांगल्या सवयी लावल्यास तुम्हाला दीर्घकाळ फायदा आणि परिमाण देईल. यामुळे तुम्हाला याचा अभिमान वाटेल. यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमचे मन, शरीर आणि मेटाबाॅलिझ्मला सुपरचार्ज करण्यासाठी पाच टिप्स सांगणार आहोत. तुम्ही दररोज फक्त दहा मिनिटे तिचा अवलंब करुन स्वतःचे शरीर पूर्ण दिवस चार्ज करु शकता.

स्ट्रेचिंग

रात्रीच्या चांगल्या झोपेनंतर लगेच दिवसाची सुरूवात करण्यापासून टाळा. झोपेत आपण वेळोवेळी शरीराची स्थिती बदलत असतो. जर अस करत नसाल तर शरीरावर त्याचा विपरित  परिणाम होईल. सकाळ स्ट्रेच पूर्ण शरीर आणि मासपेशीला मुक्त करतो आणि तुमच्या अवयवांना क्रियाशील करतो. हे रक्ताभिसरण वाढवतो. तसेच तणाव कमी करतो. स्ट्रेचिंग करण्यासाठी तुम्ही तुमची मान, खांदे, हातपाय हे खालीवर करण्याचा प्रयत्न करा.

वेळेवर उठा

सकाळचे अलार्म लावता. पण वेळेवर उठत नाही. सकाळच्या कामामुळे तुम्ही नाष्टा करत नाही आणि कार्यालयात उशीरा पोचता? तुम्हाला या सवयी सामान्य वाटतात? तर तुम्हाला यापासून लवकरात लवकर सुटका करुन घ्यायचा प्रयत्न करायला हवा. कारण यातून भीती, बेजबाबदारी, तणाव आणि काही अन्य भावनिक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे दररोज सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. 

व्यायाम करा

व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी लाभकारक आहे. कारण सकाळी व्यायाम केल्याने तुमच्या हृदयाचे कंपन आणि रक्ताभिसरण वाढते. यामुळे तुम्हाला ताजेपणा वाटत राहिल. व्यायाम म्हणजे केवळ घामाघूम होणे असे नाही. उलट त्यातून ऊर्जा आणि उत्साह वाढवतो. 

लिंबूपाणी घ्या 

सकाळच्या वेळी लिंबूपाणी घेण्याची सवय लावा. एक ग्लास लिंबू पाणी, शरीराला शुद्ध करण्याबरोबरच ते पीएचचे प्रमाण संतुलित करते. पचनक्रिया वाढवते. यामुळे तुमची ऊर्जा वाढू शकते. 

लोहयुक्त नाष्टा 

सकाळच्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे सकाळचा नाष्ट. यामुळे तुम्ही दिवसभर चार्ज राहतात. जर तुमच्या नाष्ट्यात लोहाची कमतरता असेल तर पूर्ण दिवस एनर्जीची कमतरता भासते. लोहच्या कमतरतेमुळे तुम्हाला आळस येत राहतो. कारण शरीरात ऑक्सिजनसाठी लोह फार गरजेचे असते. त्यामुळे नाष्ट्यात अंडी, हिरव्या भाज्या, पीनट बटर, शेंगदाणे आदी घेण्यास सांगितले जाते. या व्यतिरिक्त आहारात जीवनसत्त्व क चाही समावेश करा. तसेच नाष्ट्यामध्ये संत्री किंवा लिंबू सरबत प्यावे. 

संपादन - गणेश पिटेकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT