Fruit Sakal
health-fitness-wellness

कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढवायचीय, ही पाच फळे खा

प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता

सकाळ डिजिटल टीम

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. आपल्या आजूबाजूलाच पाहिलं तर अनेक लोकं सर्दी, खोकला झाल्याने त्रासलेले आहेत. ओमिक्रॉनचे (Omicron) रूग्णही वाढत आहेत. अशावेळी आपली प्रतिकारशक्ती (Immunity Power) चांगली ठेवणे गरजेचे आहे. ती चांगली असेल तरच आपले आरोग्य चांगले राहणार आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता. अनेक आरोग्यतज्ज्ञ प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याचा सल्ला देतात. म्हणूनच जर तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर तुमच्या रोजच्या आहारात पौष्टीक आणि व्हिटॅमिन सीने युक्त फळांचा (Fruits) समावेश करणे गरेजेचं आहे.

Peru

पेरू - पेरू व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले फळ आहे. व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

संत्र- संत्र हे हिवाळ्यात मिळणारे हंगामी फळ आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. ते रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते.

Custard-apple

सीताफळ (Custard Apple)- सीताफळही हिवाळ्यात मिळणारे फळ आहे. सीताफळात आढळणारे पोषक तत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.

मोसंब- व्हिटॅमीन सी भरपूर असलेले हे फळ आहे. मोसंब हृदयासाठी चांगले मानले जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मोसंबाचा आहारात वापर करणे फायद्याचे आहे.

लिंबू - लिंबू आंबट आहे. आंबट फळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच वजन नियंत्रणात राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT