health-fitness-wellness

'लाइट' सिगारेटही धोकादायक, आजच थांबवा धुम्रपान!

लाइट सिगारेट खरंच कमी धोकादायक आहे का?

शर्वरी जोशी

कोणत्याही व्यसनाचा अतिरेक करणं शरीरासाठी घातक आहे. त्यातच सध्याची तरुणाई मद्यपान व धुम्रपान (smoking) करण्याकडे जास्त आकर्षित होत आहे. सतत धुम्रपान किंवा मद्यपान केल्यामुळे अनेक शारीरिक समस्यांना आमंत्रण मिळतं हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच भावी आयुष्यात निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी काही जण या व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. परंतु, सिगारेट किंवा तंबाखू या व्यसनांपासून दूर जाणं अनेकांना कठीण असतं. म्हणूनच, त्याला पर्याय म्हणून काही जण लाइट सिगारेटची निवड करतात. लाइट सिगारेट ओढल्यामुळे त्रास कमी होतो असा अनेकांचा समज आहे. परंतु, प्रत्यक्षात लाइट सिगारेटही अन्य सिगारेट इतकीच घातक आहे. (tobacco-persistent-myths-about-smoking)

लाइट सिगारेट खरंच कमी धोकादायक आहे का?

धुम्रपानामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही जण महागड्या लाइट सिगारेट खरेदी करतात. अनेकांना वाटतं की लाइट सिगारेट घेतली तर शारीरिक त्रास कमी होईल. परंतु, प्रत्यक्षात हे साफ खोट आहे. लाइट सिगारेटमुळे कमी त्रास होतो असा समज करुन अनेक जण जास्त प्रमाणात सिगारेट ओढतात. मात्र, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लाइट सिगारेटही अन्य सिगारेट इतकीच धोकादायक आहे.

लाइट सिगारेट ओढल्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे नॅच्युरल किंवा ऑर्गेनिक नावाने विकण्यात येणाऱ्या सिगारेटही अन्य सिगारेट इतक्याच घातक आहेत.

दरम्यान, अमेरिकेतील लंग असोसिएशनचे चीफ मेडिकल ऑफिसर प्रोफेसर नॉर्मन इडेलमन यांच्या मतानुसार, तुम्ही जितक्या लवकर धुम्रपान करणं सोडाल तितकं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. वयाच्या ७० व्या वर्षीही धुम्रपान सोडलं तरीदेखील लगेच तुमच्या आरोग्यात झालेला बदल तुम्हाला जाणवू लागेल. त्यामुळे जितकं लवकर शक्य होईल तितक्या लवकर धुम्रपानाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT