mirayee hospitals
बालेवाडी हायस्ट्रीट, पुणे येथील मिरायी – सेंटर फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांट एक्सलन्स बाय रेला इन्स्टिट्यूट यांनी आपल्या केंद्रात अत्याधुनिक ‘इकोसेन्स फायब्रोस्कॅन® एक्स्पर्ट ६३०’ (Echosens FibroScan® Expert 630) उपकरण कार्यान्वित केल्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रगत यकृत विकारांचे अचूक मूल्यमापन आणि व्यवस्थापन करण्याची केंद्राची क्षमता अधिक मजबूत झाली आहे.
जागतिक कीर्तीचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन तसेच चेन्नई येथील रेला इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रो. मोहम्मद रेला आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली मिरायी केंद्र कार्यरत आहे. रोबोटिक लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आणि प्रगत रोबोटिक लिव्हर सर्जरीवर विशेष भर देत पुणे आणि उर्वरित पश्चिम भारतामध्ये जागतिक दर्जाची ट्रान्सप्लांट व लिव्हर केअर सेवा पुरवणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
"वैद्यकीय गुणवत्ता,नवोपक्रम आणि अनुकंपेच्या माध्यमातून पश्चिम भारतातील रोबोटिक ट्रान्सप्लांटसाठी सर्वात विश्वासार्ह केंद्र बनणे," हे या केंद्राचे ध्येय (व्हिजन) आहे. तसेच आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ व अत्यंत कुशल डॉक्टरांच्या माध्यमातून,आधुनिक नवोपक्रम व सहानुभूतीची जोड देऊन दर्जेदार आरोग्य सेवा देणे हे केंद्राचे मिशन आहे.
या ध्येयाला अनुसरून मिरायी केंद्राने dedicated हेपॅटॉलॉजी (Hepatology) आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मेडिसिन विभाग सुरू केला आहे, ज्याचा मुख्य भर यकृताच्या आजारांचा प्रतिबंध आणि वेळेत निदानावर आहे. त्यांचा ‘लिव्हर डिसीज प्रिव्हेन्शन अँड वेलनेस प्रोग्राम’ हा विशेषतः MASLD (मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टेअटोटिक लिव्हर डिसीज - ज्याला सामान्यतः 'फॅटी लिव्हर' म्हटले जाते) वर लक्ष केंद्रित करतो. हा आजार सध्या स्थूलपणा, मधुमेह आणि चयापचयाशी संबंधित विकारांमुळे वेगाने वाढताना दिसत आहे.
हे केंद्र तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, अत्याधुनिक प्रयोगशाळा व इमेजिंग सेवा, बॉडी कॉम्पोझिशन ॲनालिसिस, आणि वैयक्तिक जीवनशैली सुधारणा कार्यक्रमांचा मिलाफ साधून यकृताचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून त्यांचा पुढील प्रसार रोखण्यास मदत करते.
नुकत्याच बसवण्यात आलेल्या 'फायब्रोस्कॅन® एक्स्पर्ट ६३०' या उपकरणामुळे यकृताचा कडकपणा (liver stiffness), यकृतातील चरबी (liver fat) आणि प्लीहाचा कडकपणा (spleen stiffness) यांचे विना-शस्त्रक्रिया (non-invasive) अचूक मूल्यमापन करणे शक्य होणार आहे. स्प्लीन स्टिफनेसच्या मोजमापामुळे रुग्णांमधील 'पोर्टल हायपरटेंशन' (Portal Hypertension) व त्यासंबंधीच्या गुंतागुंतीचा धोका वेळेत ओळखण्यास मदत होते.
या उपक्रमाबाबत बोलताना मिरायीच्या हेपॅटॉलॉजी(यकृताचे आजार) आणि लिव्हर ट्रान्सप्लांटेशन मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. विनीत शाह म्हणाले:
"केवळ गंभीर आजारांवर उपचार करण्याऐवजी, यकृत निगा (लिव्हर केअर) क्षेत्राला आजारांचा प्रतिबंध, लवकरात लवकर निदान आणि वैयक्तिक उपचारांकडे नेणे हे आमचे उद्दिष्ट आहे. फॅटी लिव्हर आणि चयापचयाशी संबंधित इतर आजार अनेक वर्षे कोणतीही लक्षणे न दाखवता राहू शकतात. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्णांचे निदान झाल्यास, यकृताचे मोठे नुकसान होण्यापूर्वी त्यावर उपचार करण्याची संधी आपल्याला मिळते."
ते पुढे म्हणाले:"फायब्रोस्कॅन® एक्स्पर्ट ६३० हे आमच्या निदान क्षमतेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे यकृताच्या आरोग्याचे जलद आणि विना-शस्त्रक्रिया मूल्यमापन करता येते, जे क्रॉनिक लिव्हर डिसीज असलेल्या रुग्णांच्या उपचाराबाबत योग्य वैद्यकीय निर्णय घेण्यास मोठी मदत करते."
रोबोटिक ट्रान्सप्लांटेशन, प्रगत लिव्हर सर्जरी, हेपॅटॉलॉजी, प्रतिबंधात्मक लिव्हर केअर आणि अत्याधुनिक निदानाचा समतोल साधत, मिरायी पुणे आणि संपूर्ण पश्चिम भारतातील रुग्णांसाठी एक सर्वसमावेशक 'लिव्हर-केअर इकोसिस्टम' निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे