health-fitness-wellness

#PCOS : पीसीओएसच्या समस्येवर स्टेम सेल थेरपी ठरतेय वरदान

शर्वरी जोशी

अधिकांश स्त्रियांमध्ये सध्याच्या काळात पीसीओएस आणि पीसीओडी या दोन गंभीर समस्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतं. यापैकी पीसीओडीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, पीसीओएसविषयी फार कमी जणांना माहित आहेत. आजकाल तरुणींमध्ये पीसीओएसची समस्या अधिक प्रमाणात जाणून येते. त्यामुळेच या समस्येवर रामबाण उपाय कोणता किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणती ट्रिटमेंट योग्य ते जाणून घेऊयात.

पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. या समस्येमध्ये अनियमित पाळी येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे अशी सामान्यपणे लक्षणे जाणवतात. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी काही वैद्यकीय उपचार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे स्टेम सेल थेरपी.
प्रत्येक महिलेला दर महिन्याला मासिक पाळीदरम्यान होणारी वेदना ही नकोशी असते. परंतु, तरीही मासिक पाळी चुकली तर त्या चिंताग्रस्त होतात, हे स्वाभाविक आहे. सध्याची तणावग्रस्त जीवनशैली, आहाराच्या अनिश्चित वेळा, धावपळ आणि लठ्ठपणा यामुळेही पीसीओएसची समस्या उद्भवू शकते.

स्टेम सेल थेरपी म्हणजे काय?

“ही उपचारपद्धती आपल्या शरीरात आधीच अस्तित्वात असलेल्या पेशींच्या वापराशी संबंधित आहे. जे वेगवेगळ्या अवयवांचे आणि ऊतींचे कार्य दुरुस्त आणि देखरेखीसाठी कार्य करतात. या  पेशी इतर पेशींची कार्ये अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यास उत्तेजित करतात. या थेरपीद्वारे अंडाशयापासून अंडी योग्यप्रकारे विकसित करतो. शरीरातील पेशी, वाढीचे घटक आणि संबंधित पेप्टाइड्स एकत्रितपणे आजार झालेल्या वातावरणास सुधारित करण्यासाठी आणि संतुलित निरोगी झोन तयार करण्यासाठी हे शक्य आहेत. या थेरपीमुळे एंडोमेट्रियम (गर्भाशयाच्या अंतर्गत अस्तर) पुनरुत्पादित केले जाऊ शकतात. कारण मेन्स्चिमल पेशी नूतनीकरण करण्यास आणि इतर पेशींच्या प्रकारांमध्ये भिन्नता करण्यास सक्षम असतात,’’ असं डॉ. प्रदीप महाजन यांनी सांगितले.

पुढे ते म्हणतात, ‘‘स्टेम सेल थेरपीद्वारे योगा आणि विशिष्ट व्यायाम यावरही भर दिला जात आहे. एकत्रितपणे करण्यात येणाऱ्या उपचारांमुळे निश्चितच मदत मिळतेय. या उपचाराचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे’’.

(डॉ. प्रदीप महाजन हे स्टेम आरएक्सचे रिजनरेटिव्ह येथे मेडिसीन रिसर्चर आहेत.)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT