health-fitness-wellness

महिलांनो, मूत्रमार्ग संसर्गाकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं घातक

१५ ते ४५ या वयोगटांतील महिलांनी जास्त काळजी घेण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला

शर्वरी जोशी

उन्हाळा संपून आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र तरीदेखील उन्हाळ्यात जाणवणारा मूत्रमार्गाच्या जंतूसंसर्गाचा त्रास अद्यापही अनेकांना जाणवत आहे. साधारणपणे उन्हाळ्यात हा त्रास उष्णता, शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे जाणवत असतो. खासकरुन हा त्रास महिलांमध्ये अधिक प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळेच पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील यूरोलॉजिस्ट डॉ. सूरज लुनावत यांनी मूत्रमार्गाचा जंतुसंसर्गाची कारणे, लक्षणे सांगितली आहेत. तसंच त्यावर उपाय कोणतेहेदेखील सांगितले आहेत. (urine-infection-symptoms-cause-and-treatment)

मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाची लक्षणे -

१. मूत्राशय सतत भरल्यासारखे वाटणे

२. सतत लघवीला होणे

३. मूत्रोत्सर्जन करताना वेदना होणे

४. दाह होणे

५.लघवीचा रंग गडद असणे

६. लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण असणे

७. लघवीचा उग्र वास येणे

८.महिलांच्या ओटीपोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे मूत्रमार्गाचा संसर्गामध्ये दिसून येतात.

महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग होण्याची कारणे -

१. जिवाणू व बुरशी ही योनीमार्गाचा संसर्ग होण्याची दोन प्रमुख कारणे.

२. योनी मार्गातील त्वचा कायम ओली राहणे.

३. योनी मार्गाची स्वच्छता न राखणे.

४. जंतुसंसर्ग असलेल्या साथीदारासोबत लैंगिक संबंध ठेवल्यास जिवाणूजन्य संसर्गाचा धोका असतो.

५. योनी मार्ग अस्वच्छ राहिल्यास मधुमेही स्त्रियांनाही योनीमार्गात कॅण्डिडा या बुरशीमुळे दाह सहन करावा लागतो. या संसर्गात लघवी होण्यास सुरुवात झाल्यावर वेदना होतात. अशा प्रकारचा त्रास १५ ते ४५ या वयोगटांतील महिलांमध्ये अधिक दिसतो.

वारंवार लघवी होणे, जास्त काळ मूत्र धरून ठेवणे आणि अस्वच्छतेमुळे युटीआय संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. योनीमार्गात जास्त घाम येणे हेदेखील जंतूसंसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. यूटीआयशी निगडीत सर्वात सामान्य जीवाणू म्हणजे एशेरिचिया कोलाई हा आहे. हा जीवाणू संक्रमणास जबाबदार आहे. कोणत्याही वयोगटातील महिलांना याचा त्रास होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येणा-या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या काही महिन्यांमध्ये ५० ते ६० रुग्णांमध्ये मूत्रमार्ग संसर्गासंबंधी तक्रारींवर उपचार करण्यात आले. यूटीआय संसर्गाच्या समस्येकडे वेळीच न दिल्यास पायलोनेफ्रायटिस (मूत्रपिंडाचा दाह) किंवा सेप्सिससारखी गंभीर गुंतागूंत होऊ शकते. म्हणून, एकदा लक्षणे दिसल्यास उपचारास विलंब करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT