use turmeric and keep immunity strong said doctor
use turmeric and keep immunity strong said doctor  
health-fitness-wellness

इम्युनिटी ठेवा मजबूत, व्यायाम करा टाइट तरच कोरोनाशी फाइट; डॉक्टर म्हणतात हे करा आणि वाढवा इम्युनिटी

केवल जीवनतारे

नागपूर : विषाणू पोटावाटे शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीराचे अग्नी असलेले पोट, तसेच शरीरात आईचे काम करणारी दुसरी अग्नी म्हणजे यकृत हे सक्षम करण्याची गरज आहे.

हे सक्षम झाले की, कोणताही विषाणू आघात करू शकत नाही. पोट, यकृत आणि प्लाझ्मा ही मानवी शरीरातील शक्तिस्थळांना सक्षम करण्यासाठी आयुर्वेद औषधीय गुणधर्म असलेल्या वस्तूंचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. यातूनच कोरोनासारख्या विषाणूशी लढण्याचे बळ मिळते.

१) ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या ठरवून घ्यावी. आहारविहार करावा. आपली जीवनशैली सुधारण्यावर भर द्यावा. धूम्रपान, मद्यपान, अधिक मांसाहार टाळावा. पचनासाठी सुलभ आहार असावा. प्राणायामसारखा व्यायाम करावा; जेणेकरून कोरोनासारख्या विषाणूशी लढण्याचे बळ शरीरातच तयार होते.

२) आवळा, सुंठ, पिंपळी, मिरे, भारंगी, समीर पन्नाग रस, दालचिनी, श्वासकुथार रस, अश्वगंधा, सुतशेखर रस यांसारख्या आयुर्वेदातील औषधी रोगप्रतिकारकशक्ती वाढवून श्‍वसनाचे आजारसुद्धा दूर ठेवतात. हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने बरेच आजारांपासून संरक्षण करता येते. यकृत छाननीचे काम बरोबर करते. यासाठी दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढते.

३) हळद अग्नीची शक्ती वाढवते. पोट आणि यकृताची शक्ती वाढवते. पिंपळी रसधातूची शक्ती वाढवण्यास मदत करते. शरीरात कफ तयार होऊ देत नाही. कोरडा खोकला-दमा दूर करण्यास मदत होते. आता लस येईलही; परंतु शरीरातील विषाणू मारण्यासाठी लस घ्यावी, यापेक्षा आपले शरीरच कोरोनासारख्या विषाणूशी लढण्यासाठी सक्षम करावे. 

४) हळदीचा चहा अर्थात गोल्डन ‘टी’ किती गुणकारी असतो, याचा अनुभव आपण घ्यावा. हळद आणि पिंपळी यांचे एक ग्रामपर्यंतचे मिश्रण घ्यावे. गुडुचीचा काढा फायद्याचा ठरतो. सकाळ-संध्याकाळ उपाशी पोटी दहा ते वीस मिलि हा काढा घेतल्यास रोगप्रतिकारकशक्ती नक्कीच वाढेल. या काढ्यामध्ये पित्त आणि वात शमनाची ताकद असल्यामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रतिकार करू शकतो.

-डॉ. मोहन येंडे, उपप्राचार्य, डॉ. भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT