Sakal - 2021-03-06T235316.921.jpg 
health-fitness-wellness

उन्हाळ्याची चाहूल! 'कफ'वर मात करायची तर 'हे' पदार्थ टाळा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : संसर्गामुळे सर्दी-खोकला-कफचा त्रास बहुतेक जणांना सतावतो. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा त्रास तुम्हाला वारंवार होण्याची शक्यता असते. यासाठी सर्दी-खोकला झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. यादरम्यान काही गोष्टी खाणे टाळल्यास तुम्ही लवकर बरे होऊ शकता. तळलेले अन्नपदार्थ :तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स जास्त प्रमाणात असल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकत नाही. यामुळे यादरम्यान असे खाणे टाळावे, कफ प्रवृत्तीच्या पेशंटनी आहाराची काही पथ्ये सांभाळणे महत्त्वाचे असते. आहारातील समतोल बिघडला तर शरीराच्या कुरबुरी सुरू होतात.

हे लक्षात ठेवा :

- कफ प्रवृत्ती असलेल्यांनी थंड पदार्थांचे सेवन करू नये.
- रात्री थंड पाणी पिणे टाळावे.
- सकाळी दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करावी.
- जेवणात तिखट, कडू, तुरट पदार्थांचा समावेश असावा.
- द्रवरूप पदार्थ कमी खावेत.
- दुपारी जेवणानंतर लगेच झोपू नये.
- भाजलेले, तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत.
- संध्याकाळी कोरडे पदार्थ, लाह्या, फुटाणे यासारखे पदार्थ खावेत.
- रात्रीचे जेवण कमी प्रमाणात घ्यावे.
- दोन खाण्यांच्या मध्ये सहा तासांचे अंतर ठेवावे.
- जागरण करू नये.

काय खाल? काय टाळाल?

- पिकलेले केळे, आंबा, दुधाचे पदार्थ, बर्फ, चिंच, गार पाणी वर्ज्य मानावे
- आहारात तेलाचा वापर कमी करावा
- दही, आंबट पदार्थ, तळलेले पदार्थ, वांगी, लोणचे, पापड, कारले, शिळे पदार्थ, आंबट फळे खाऊ नयेत.
- टॉमेटो, तेलकट पदार्थ, कच्चे सॅलड, मटण, आंबवलेले पदार्थ, राजमा, वाटाणा, हरभरा, पांढरा वाटाणा, भेंडी, कैरी, शीतपेये, थंड दूध, आईस्क्रीम सतत खाल्ले तर वात वाढतो व पचनशक्ती कमी होते.
- बेसन, बटाटा, शिळे अन्नपदार्थ, काकडी, रताळी, चिवडा, फरसाण, वेफर्स असे पदार्थ टाळावेत.

हे अवश्य खा....

तांदूळ आणि ज्वारी, बाजरी, नाचणी यापासून केलेली भाकरी, मूगडाळ, मसूरडाळ आणि अख्खे मसूर, लाल भोपळा, पडवळ, कारलं, गाजर, बीट, कोथिंबीर, कांदा, मेथी, फळांपासून तयार केलेले पेय, सेलरी, पालक, खरबूज.
मसाले : आले, लसूण, लवंग, दालचिनी, काळीमिरी, कडुलिंब, वेलची.
फळे : अ‍ॅव्हाकॅडो, जर्दाळू, गोड द्राक्षे, सफरचंद, राय, केळी, नारळ, अंजीर, खजूर, टरबूज, पपया. मध, चिकन, अंडी, मासे, शिजवलेला कॉलिफ्लॉवर, ब्रोकोली, कडधान्ये आणि कोबी चालू शकतो.

(डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT