Vasundhara Talware
Vasundhara Talware Sakal
health-fitness-wellness

योगा लाईफस्टाईल : नाडी शुद्धी प्राणायाम

वसुंधरा तलवारे

आपल्या शरीरामध्ये तब्बल ७२ हजार नाडी आहेत. या नाडींद्वारे जीवनाचे सुक्ष्म बळ संपूर्ण शरीरात वाहत असते आणि त्यामुळे आपले सर्व अवयव, स्नायू, सांधे, उती, सर्व प्रकारची द्रव्ये, पेशी कार्यरत असतात आणि त्या निसर्गाशी एकरूप होत असतात. नाडी म्हणजे तुमच्या शरीरात ऊर्जेचे वहन करणारे पाइप आहेत, अशी कल्पना करा. या पाईपांमध्ये थोडा जरी अडथळा निर्माण झाला, तर ऊर्जेचा प्रवाह कमी होतो. काही वेळ तो थांबतो आणि ऊर्जेपासून वंचित राहणाऱ्या अवयवांमध्ये बिघाड निर्माण होतो व त्यातून तुम्हाला आजार जडतात.

नाडी शुद्धी याचा अर्थ या नाडींची सफाई करणे. प्राणायामाच्या माध्यमातून या नाडींची सफाई होते व ऊर्जेच्या वहनात कोणतेही अडथळे निर्माण झाले असल्यास ते दूर केले जातात. त्यातून आपण पूर्ण ऊर्जेनिशी कार्यरत राहू शकतो. त्यातून आपली प्रतिकारशक्ती वाढते व जागरूकताही वाढीस लागते. आपल्या दोन्ही नाकपुड्यांतील श्वासोच्छ्वासात अधिक समतोल साधला जातो. आपण डाव्या नाकपुडीतून श्वास घेतो, तेव्हा उजवा मेंदू कार्यान्वित होतो, तर उजव्या नाकपुडीत श्वास घेताना डावा मेंदू कार्यान्वित होतो. आपण लांब, हळूवार व समतोल श्वास घेतो, तेव्हा त्याचे अनेक महत्त्वाचे परिणाम होतात. त्यातून शरीरातील ऊर्जेचा प्रवाह शांत व समतोल होतो. त्यातून तुम्हाला शांतता लाभते, चिंता कमी होते, एकाग्रता सुधारते व अज्ञ चक्राला गती मिळते. एवढेच नव्हे, तर मेंदू व हृदयाच्या कार्यात तालबद्धता निर्माण झाल्याचा अनुभव मिळतो. यातून हृदयाचे किंवा मज्जासंस्थेची संबंधित आजार असणाऱ्यांना, तसेच खूप ताणात जगणाऱ्यांना अधिक आराम मिळतो. या प्राणायमातून तुमच्या मूड सुधारतो व त्यातून प्रतिकारशक्ती वाढीस लागते.

नाडी शुद्धी प्राणायमाचे तंत्र

  • ध्यानधारणेच्या तुम्हाला आरामदायी वाटणाऱ्या स्थितीमध्ये बसा.

  • तुमचे डोके व पाठीचा कणा ताठ ठेवा, शरीर आरामदायी स्थितीत ठेऊन डोळे बंद करा.

  • छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे उजव्या हाताचा उपयोग करून प्रणव मुद्रेत या. तुमचे अंगठ्याशेजारचे व मधले बोट वाकवा. अंगठा, करंगळी शेजारचे बोटे व करंगळी बाहेरच्या दिशेला घ्या. अंगठ्याच्या मदतीने उजवी नाकपुडी बंद करा व करंगळीच्या मदतीने डावी नाकपुडी बंद करा. तुमचा डावा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा.

नाडी शुद्धी प्राणायमाच्या पायऱ्या

  • अंगठ्याच्या मदतीने उजवी नाकपुडी बंद करा.

  • डाव्या नाकपुडीतून पाच वेळा श्वास आत घ्या व बाहेर सोडा. श्वासोच्छ्वास सामान्य स्थितीमध्ये ठेवा. हे क्रिया उजव्या नाकपुडीच्या मदतीने पाच वेळ करा.

  • प्रत्येक श्वासाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.

  • अंगठ्याच्या मदतीने उजवी नाकपुडी बंद करा व डाव्या नाकपुडीच्या मदतीने १ ते ३ आकडे म्हणत पूर्णपणे श्‍वास घ्या.

  • कोणत्याही ताण न घेता खोल श्‍वास घ्या.

  • आता करंगळीच्या मदतीने डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीवर अंगठ्याच्या मदतीने दिलेला ताण कमी करा. उजव्या नाकपुडीतून श्वास पूर्णपणे बाहेर सोडा. जेवढा वेळ श्वास घेण्यासाठी लागला, तेवढाच वेळ श्वास सोडण्यासाठी घ्या. (एकास एक प्रमाण)

  • अशा प्रकारे पहिली फेरी पूर्ण झाली.

  • अशा ५ ते १० फेऱ्या पूर्ण करा.

  • तुम्हाला श्वास आत घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया सोपी जात असल्यास ही क्रिया ३ ऐवजी ४ आकड्यांपर्यंत वाढवू शकता. हे आकडे तुम्ही सरावातून दहापर्यंत वाढवू शकता.

ही काळजी घ्या

  • या प्रक्रियेतून तुम्ही अंतर्मुख होण्याची शक्यता असते, त्यामुळे नैराश्यासारखे आजार असणाऱ्यांनी हा प्राणायाम करू नये.

  • हृदयाचा आजार असलेल्यांनी खूप जास्त वेळ श्वास आत घेण्याची व बाहेर सोडण्याची प्रक्रिया टाळावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT