Vasundhara Talware Sakal
health-fitness-wellness

योगा लाइफस्टाइल : ताडासन (पर्वतासन स्थिती)

आपण गेल्या आठवड्यात सूर्यनमस्कारामधील एका पाठोपाठ करावयाच्या आठ वेगवेगळ्या आसनांची माहिती घेतली.

वसुंधरा तलवारे

आपण गेल्या आठवड्यात सूर्यनमस्कारामधील एका पाठोपाठ करावयाच्या आठ वेगवेगळ्या आसनांची माहिती घेतली. त्यातून मानसिक आणि शरीरात अंतर्गत होत असलेल्या परिणामांची अनुभूतीही आपल्याला जाणवली असेलच.

सूर्यनमस्कार करण्यापूर्वीची पहिली पायरी म्हणजे दोन्ही पाय एकमेकांना जुळवून किंवा त्यामध्ये काही अंतर ठेवून ताठ उभे राहावे. दोन्ही हात शरीरापासून काही अंतरावर कोणताही ताण न देता अधांतरी ठेवणे. शांतपणे डोळे बंद करून संपूर्ण शरीर एकाग्र करावे. शरीर किंचितसे हेलकावे घेत असल्याचे जाणवत असल्यास ते शांत करण्याचा प्रयत्न करा.

संपूर्ण शरीराचे वजन दोन्ही पायांवर एकसारखे ठेवावे. दोन्ही पायांचे तळवे जमिनीला समांतर आहेत, याची खात्री करा. संपूर्ण शरीर गुरुत्वाकर्षणाने खाली खेचले जात असल्याचा, तसेच शरीराचा ताण जमिनीच्या दिशेने जात असल्याचा अनुभव घ्या. त्याच बरोबर आपल्या शरीराच्या संपूर्ण सामर्थ्याचा अनुभवही आपणास येईल. शरीरामध्ये हळूहळू जागरूकता आणून मन शांत करा. डोक्याच्या केसापासून प्रारंभ करत शरीरातील एकएक अवयव ताणापासून शिथिल करायला सुरूवात करा. पूर्ण शरीरातील जागरूकता वाढवत त्याच्याशी सुसंगत असा अनुभव घ्या. त्यानंतर डोक्यावरील केस दोन्ही भुवयांमधील केंद्र, हृदयाचे केंद्र यातून निर्माण होणाऱ्या उपचार शक्तींना चैतन्य देण्याचा प्रयत्न करा.

हे आसन तुम्ही डोळे बंद करून एक मिनीट करू शकता. योगासनाचा सराव वाढल्यावर डोळे बंद करून तासभरही करून त्याचे फायदे अनुभवता येतील. हट सरावाचा हा भाग आहे. ‘स्थिरम् सुखम आसनम्’, अर्थात आसनामध्ये स्थिर आणि आरामदायी राहणे ही प्रथा आहे.

ही काळजी घ्या

  • दोन्ही खांदे आरामदायी ठेवा.

  • मान ताठ आणि हनुवटी जमिनीला समांतर ठेवा.

  • दोन्ही हात बाजूला आरामदायी ठेवा.

  • पोटाचा आतील भाग मणक्याच्या दिशेने ओढला जातो.

  • टेलबोन काही प्रमाणात ओढला जातो.

  • मांडीला काही प्रमाणात ताण मिळतो.

  • पायाच्या बोटांत अंतर ठेवून टाचा थोड्या प्रमाणात वर उचलायच्या.

आसनाचे फायदे

  • पायांमधील ताकद वाढते.

  • खांद्यांचे जोड मजबूत होतात.

  • उदर आणि पार्श्‍वभागाचे स्नायू बळकट होतात.

  • पाठीचा कणा, गुडघ्याचे स्नायू बळकट होतात.

  • शरीराचा तोल सांभाळण्यास उपयुक्त

  • शरीर सुडौल राहते.

  • सायटिकासारख्या दुखण्यांवर उपयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CET Percentile Scam : महाराष्ट्रात CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा घोटाळा?; चौकशी होण्याची शक्यता

Pimpri Rain: मुसळधार पावसाने पवना धरण ९६ टक्क्यांवर; आंद्रा शंभर टक्के भरले, पिंपरी परिसरात मुसळधार, तीन गावांचा संपर्क तुटला

Latest Live Updates Marathi : : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस रस्त्यावरून थेट घरावर कोसळली; ३९ जण जखमी

Kalsubai Harishchandragad Sanctuary : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! भंडारदरा, कळसूबाई अन् हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्यांचा प्लॅन फसणार; 'या' कारणामुळे ट्रेकिंगवर बंदी

Shooting World Cup: भारताच्या ईशा सिंगची सुवर्णपदकावर मोहर, तर मनू भाकरला ब्राँझपदक

SCROLL FOR NEXT