Vasundhara Talware Sakal
health-fitness-wellness

योगा लाइफस्टाइल : प्रणामासन

सूर्यनमस्काराच्या आसनांच्या मालिकेतील हे पहिले आणि सोपे आसन आहे. आपण गेल्या भागात सूर्यनमस्कारापूर्वी करायच्या.

वसुंधरा तलवारे

सूर्यनमस्काराच्या आसनांच्या मालिकेतील हे पहिले आणि सोपे आसन आहे. आपण गेल्या भागात सूर्यनमस्कारापूर्वी करायच्या, तसेच शरीराला स्थिरता, मनःशांती देणाऱ्या ताडासनाची माहिती घेतली. त्याचा सराव तुम्ही केला असेलच.

आपण या भागात प्रणामासनाची माहिती घेणार आहोत. प्रणामासन हा योगासनाचा मध्यवर्ती प्रकार असून, भारतीय संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आपण एकमेकांना भेटतो, त्यावेळी परस्परांना नमस्कार करून अभिवादन करतो. एका अर्थी आपण एकमेकांना सन्मान करत असतो. आध्यात्मिक भाषेत समोरच्या व्यक्तीच्या आत्म्याला सन्मान देत त्याच्यापुढे वाकणे होय. संस्कृतमध्ये प्रणाम म्हणजे जीवन, आत्मा किंवा मान देणे आणि आसन म्हणजे बसणे. आपण या आसनाचा सराव करताना त्याचा मनावर आणि शरीरावर चांगला परिणाम होत असल्याचे आपल्याला जाणवते आणि त्याचा फायदा आपल्याला श्वासोच्छवासासाठी होतो.

या आसनाची मूलभूत तत्त्वे ही ज्ञान, भक्ती आणि ऊर्जेशी संबंधित आहेत. शारीरिक सुदृढतेसाठी याचा खूप फायदा होतो. अनेक नागरिकांनी मनाच्या आणि शरीराच्या शांतीसाठी या आसनाचा सराव सुरू केला आहे. मानसिक आणि शारीरिक दोषांच्या संतुलनासाठी दररोज एक मिनीट ते एक तासापर्यंत याचा सराव करण्यास नागरिकांनी सुरूवात केली आहे. अधिक सरावानंतर एका पायावर उभे राहून तुम्ही हे आसन करू शकता.

असे करा आसन

  • डोळे शांतपणे बंद करा.

  • दोन्ही पाय जुळवून उभे राहावे

  • हळुवारपणे खांदे वाकवून दोन्ही तळहात छातीसमोर जुळवून नमस्कार मुद्रेत उभे राहावे. जीवनाला ऊर्जा देण्याऱ्या सूर्याला मनोभावे नमस्कार करा.

  • संपूर्ण शरीर आरामदायक ठेवा.

  • श्वसन शांतपणे सुरू ठेवा.

  • संपूर्ण लक्ष ह्रदयाच्या केंद्रस्थानी (अनाहत चक्र) केंद्रित करा.

  • त्यानंतर ‘ओम मित्राय नमः’ हा मंत्र उच्चारत सर्वांचा मित्र असणाऱ्या सूर्याला नमस्कार करा.

आसनाचे फायदे

  • मानसिक शांती मिळते.

  • हार्मोन्सचे संतुलन होते.

  • शरीरात सूर्य आणि चंद्राचे संतुलन असलेल्या इडा व पिंगळा या नाड्यांवर नियंत्रण.

  • शरीराचा पोत सुधारतो.

  • एकाग्रता वाढते

  • शरीर शिथिल होण्यास मदत.

  • आध्यात्मिक ऊर्जेत वाढ

  • शरीर आणि मनाचे नियंत्रण होते.

  • पायाचे स्नायू आणि हाडांचे बळकटीकरण

प्रणामासन केवळ योगासना दरम्यानच करावे असे नाही. दिवसभरात तुम्ही हे आसन केव्हाही करू शकता. तुमचे काम सुरू असताना ताठ बसा. डोळे मिटा आणि दोन्ही तळहात जोडून शांतपणे श्वासोच्छ्वास सुरू ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CET Percentile Scam : महाराष्ट्रात CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा घोटाळा?; चौकशी होण्याची शक्यता

Pimpri Rain: मुसळधार पावसाने पवना धरण ९६ टक्क्यांवर; आंद्रा शंभर टक्के भरले, पिंपरी परिसरात मुसळधार, तीन गावांचा संपर्क तुटला

Latest Live Updates Marathi : : जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंची बस रस्त्यावरून थेट घरावर कोसळली; ३९ जण जखमी

Kalsubai Harishchandragad Sanctuary : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! भंडारदरा, कळसूबाई अन् हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्यांचा प्लॅन फसणार; 'या' कारणामुळे ट्रेकिंगवर बंदी

Shooting World Cup: भारताच्या ईशा सिंगची सुवर्णपदकावर मोहर, तर मनू भाकरला ब्राँझपदक

SCROLL FOR NEXT