health-fitness-wellness

अष्टांग योगातील यम म्हणजे काय व त्याचे प्रकार- भाग २

महर्षी पतंजलींच्या मूळ अष्टांग योगदर्शन शास्त्राचा आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे.

देवयानी एम., योगप्रशिक्षक

आतापर्यंत झालेल्या लेखांमध्ये आपण योग म्हणजे काय? योगची प्राथमिक भूमिका काय? किंवा योग का करावा? यांची माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे इतक्यावरच न थांबता आपण महर्षी पतंजलींच्या मूळ अष्टांग योगदर्शन शास्त्राचा आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे. यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील पहिल्या अंगाचं म्हणजेच ‘यम’ (Social Code of Conduct) याच्यातील अहिंसा, सत्य ही दोन महाव्रते समजून घेतली. त्यानंतर आता अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह यांची माहिती घेणार आहोत. (what-is-yama-in-ashtanga-yoga-part-2)

१. अस्तेय -

अस्तेय याचा सरळ अर्थ आहे चोरी न करणे. एखाद्याची वस्तू किंवा विचार त्याला न कळवता घेणे ही चोरी आहे. फक्त स्वतःपुरता उपभोगात्मक विचार करणे, कोणाचेही पैसे, अधिकार, स्वातंत्र्य, त्याच्या कामाचे श्रेय आपण घेतल्यास ती चोरीच आहे.

२. ब्रह्मचर्य -

योग साधण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे हे व्रत. सामान्यतः लैंगिक सुख वर्ज्य करण्याला ब्रह्मचर्य म्हणतात. पण पूर्ण विचार करता लक्षात येईल, की आपले मन आणि बुद्धी हे इंद्रियांद्वारा विषयाकडे धावतात, त्यामुळे वासनेला आवर हे इंद्रियांच्या नियमनाने होणार आहे. ब्रह्मचर्याचा व्यापक अर्थ आहे ‘ब्रह्म चिंतनात अखंड राहणे’. ब्रह्म (चैतन्य तत्त्व/आत्मतत्त्व) + चर्या (अनुसंधान). ब्रह्मचर्य हे मन स्थिर करण्याचे साधन आहे.

३. अपरिग्रह -

आपण जे मिळवतो ते आपल्या गरजेसाठी, ज्याच्यामुळे आपले पोषण, वर्धन, रक्षण होत असते. मात्र, आपण काही अनावश्यक गोष्टींचा संग्रहही करतो. वस्तूंचा विनाकारण संग्रह म्हणजे परिग्रह. कपाट उघडून किती टक्के कपडे व वस्तू गेल्या सहा महिन्यांत वापरल्या नाहीत, ते बघा! अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे तो अपरिग्रह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

Kirit Somaiya Amravati Meeting Controversy : आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत; किरीट सोमय्यांची अमरावतीची बैठक ठरतेय वादग्रस्त?

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT