वर्षभरापूर्वी देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. करोनाचा संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचं लसीकरण करण्यावर भर देण्याची उपाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनीही लसीकरण मोहिमेला जोर दिला असतानाच केंद्राने कोविशिल्ड (Covishield)लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन डोसमधील अंतर वाढवण्यावरून प्रश्नही उपस्थित केले जात आहे. करोनाचा फटका बसलेल्या युकेमध्ये दोन लसींमधील अंतर कमी करण्यात आलेलं असताना भारताने हे अंतर का वाढवलं? अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. (Why did India increase gap between jabs when UK reduced it?)
युकेमध्ये पहिला डोस घेतल्यानंतर १२ आठवड्यानंतर दुसरा डोस दिला जात होता. मात्र, आता ते अंतर कमी करुन ८ आठवड्यांवर आणलं आहे. देशातील अधिकाधिक लोकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीने दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जेणेकरून नागरिकांना कमीत कमी एका डोसचं संरक्षण मिळण्यासाठी हा निर्णय घेलला होता. ब्रिटनच्या मुख्य वैद्यकीय प्राध्यापक ख्रिस व्हिट्टी यांनी सांगितलं. आता करोनाच्या बी.1.617 या नव्या स्ट्रेनमुळे करोनाचा उद्रेक होत असून, हा धोका लक्षात घेऊन ब्रिटनने दोन्ही डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय आता घेतला आहे. परंतु, कोरोनाचं सावट असतानादेखील भारताने मात्र, दोन लसीकरणांमधील का वाढवलं या नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
कोविशिल्डच्या पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये जर जास्त अंतर असेल, तर मधला काळ हा अँटीबॉडीज तयार होण्यासाठी जास्त प्रभावी ठरु शकतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारने या निर्णयाची माहिती देताना म्हटलेलं आहे. कोविशिल्डचा पहिला डोस ६० ते ८५ टक्के परिणामकारक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे, असं सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचा योग्य असल्याचं पटवून देताना नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले, ब्रिटनने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला आहे. म्युटंट आणि महामारी आदी गोष्टींचा विचार केला गेला आहे. तर भारताने महामारीच्या धोक्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे," असं पॉल यांचं म्हणणं आहे.
वेल्लोर येथील ख्रिचियन मेडिकल कॉलेजमधील व्हायरॉलॉजी विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ.टी. जेकब म्हणाले,"सर्व लशींबद्दलची आजपर्यंतच्या माहितीप्रमाणे जर पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्यास एका वर्षाचा विलंब झाला, तरी पहिल्या डोस परिणामकारकता कमी होत नाही. त्याचा प्रभाव कायम राहतो. पण, महामारीच्या काळात सुरक्षित राहायचं असेल, तर चार आठवड्यांच्या अंतराने दुसरा डोस देणं अधिक फायदेशीर आहे. सध्याची परिस्थिती बघता, चार आठवड्यांचा कालावधी योग्य आहे. जर लशींचा तुटवडा असेल, तर दोन डोसमधील अंतर वाढवणंही ठिक आहे. कारण अधिकाधिक लोकांना पहिला डोस मिळायला हवा. पण, मृत्यू रोखण्यासाठी दोन्ही डोस घेणं आवश्यक आहे," असं जेकब यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.