Vaccine 
health-fitness-wellness

हिवाळ्यात तुमच्या मुलांचे लसीकरण करणे का गरजेचे? जाणून घ्या

तुमच्या मुलांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

पालकांनो, हिवाळ्यामध्ये तुमची मुलं ताप,कफ, थंडी आणि इतर संक्रमणास बळी पडू शकतात. त्यामुळे तुमच्या मुलांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. असे न केल्यास तुमच्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. लवकरात लवकर तुमच्या फॅमिली डॉक्टरलाच्या भेटा आणि तुमच्या मुलांच्या लसीकरणाबाबत जागृत राहा. कारण प्रश्न तुमच्या मुलांच्या आरोग्याचा आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार आहे. हिवाळ्यात तुमचे मुलं आनंदी आणि निरोगी राहील याची काळजी घेण्यासाठी आणखी वाचा....

सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे. आपल्यापैकी अनेकजण या ऋतूची आतूरतेने वाट पाहत आहेत. हा सर्वात आनंददायी ऋतूंपैकी एक आहे, परंतु जेव्हा तुमच्या मुलांचा प्रश्न येतो तेव्हा तो गंभीर आरोग्य समस्यांना देखील आमंत्रण देऊ शकतो. इन्फ्लूएंझामुळे लहान मुलं आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. इन्फ्लूएन्झाला फ्लू असे देखील म्हणतात, हा नाक, घसा आणि फुफ्फुसाचा संसर्ग आहे जो, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरू शकतो. ताप, डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणे, वाहणारे नाक आणि स्नायू दुखणे ही इन्फ्लूएंझाची लक्षणे आहेत. काही मुलांना पोटाचा त्रास आणि जुलाब देखील होऊ शकतात.

Vaccine

म्हणून, प्रत्येक हिवाळ्यात सहा महिने आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व मुलांना इन्फ्लूएंझा प्रतिबंध लस घेण्याची शिफारस केली जाते. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या असलेले लोक इन्फ्लूएंझामुळे खूप आजारी पडू शकतात. म्हणून, वार्षिक इन्फ्लूएंझा लस या गंभीर आजारापासून आपल्या मुलाचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला दरवर्षी फ्लू प्रतिबंधक लस घेण्याची शिफारस केली जाते. लहान मुलांच्या बाबतीत, त्यांच्या पालकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, मुलाचे लसीकरण वेळापत्रक कोणत्याही परिस्थिमध्ये चुकणार नाही. मुलांना वेळच्या वेळी लस मिळेल.

फ्लू प्रतिबंधक लसीकरणाचे वेळापत्रक कसे तयार करायचे? ते जाणून घ्या

फ्लू प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मुलांच्या जन्माच्या सहा महिन्यांनंतर दिला जाऊ शकतो, कारण सहा महिन्यांपर्यंत मुलांमध्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या आईकडून मिळालेली रोगप्रतिकारशक्ती असते. म्हणून, एकदा मुलं सहा महिन्यांचे झाले की, मुलं पाच वर्षांचे होईपर्यंत त्यांना दरवर्षी त्यांच्या मुलाला फ्लू प्रतिबंधक लसीकरणचा डोस मिळेल याची पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सहा वर्षांवरील मुलांना दमा, रोगप्रतिकारकशक्ती किंवा हृदयाच्या समस्यांसारख्या काही गंभीर परिस्थिती असल्यास त्यांना फ्यू प्रतिबंधक लसीचा डोस मिळू शकतो. त्यानुसार डॉक्टरांशी बोला आणि लसीकरणाचे वेळापत्रक सेट करा. ही लस शॉटद्वारे दिली जाते, म्हणजे सुईच्या मदतीने जी लस मुलाच्या शरीरात, हातातून टोचली जाते. फ्लूच्या प्रतिबंधक लसी एखाद्याला अँटीबॉडीज विकसित करण्यास आणि इन्फ्लूएंझाशी लढण्यास मदत करू शकतात.

Vaccine

मुलांसाठी हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि फ्लूपासून बचाव करण्यासाठी टिपा

मुलाला दरवर्षी इन्फ्लूएंझा प्रतिबंधक लस मिळणे अत्यावश्यक आहे. तुमच्या मुलाला वारंवार हात धुण्यास आणि खोकताना आणि शिंकताना तोंड झाकण्यासाठी प्रोत्साहित करा. शक्य असल्यास त्यांना मास्क लावा. तुमचे लहान मूल, आजारी लोकांपासून दूर राहील यांची याची खात्री करा. फर्निचर, दरवाजाचे हँडल, नळ आणि स्वयंपाकघरातील काउंटरटॉप यांसारख्या दूषित पृष्ठभागांना स्पर्श करणे टाळा. तसेच, मुलांनी त्यांच्या तोंडाला, चेहऱ्याला, नाकाला स्पर्श करणे टाळावे याची काळजी घ्या. तुमच्या मुलाने संतुलित आहार घ्यावा जो रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करेल. या सर्व खात्रीशीर युक्त्या तुमच्या मुलाला त्या थंडीच्या महिन्यांत निरोगी राहण्यास मदत करतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT