sleep esakal
health-fitness-wellness

महिलांना लागते पुरुषांपेक्षा जास्त झोप! ही आहेत कारणे

पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाश आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते

सकाळ डिजिटल टीम

मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी झोप शरीरासाठी अत्यंत गरजेची आहे. पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने लोकानी घरून काम करणे पुन्हा सुरू केले आहे. कोरोनामुळे वाढलेली चिंता, योग्य शारीरिक हालचालींचा अभाव, याचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोच. शिवाय झोपेच्या गुणवत्तेवरही हानिकारक परिणाम होतो. याचा जास्त त्रास स्त्रियांना, विशेषतः नोकरी करणाऱ्या आयांना होतो. तज्ञांच्या मते, महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोप लागते.

sleep

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये एक्सप्लोरिंग सेक्स अँड जेंडर डिफरन्सेस इन स्लीप हेल्थ: अ सोसायटी फॉर वुमेन्स हेल्थ रिसर्च रिपोर्ट या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या 2014 च्या अभ्यासात असे आढळून आले की पुरुष आणि स्त्रियांचे झोपेचे तास वेगवेगळे आहेत आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाश आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते. तसेच पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त झोपतात, असे त्यात म्हटले आहे.

डॉ. सिबाशीष डे, आशिया आणि लॅटिन अमेरिकेसाठी ResMed चे वैद्यकीय व्यवहार प्रमुख, हे हा अभ्यास योग्य असल्याचे मानतात. त्यांनी इंडियन एक्सप्रेसला याविषयी सांगितले आहे. त्यांनी स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोप का लागते, झोपेच्या कमतरतेचे परिणाम, स्त्रिया झोपेचे गणित चांगल्या प्रकारे कशा व्यवस्थापित करू शकतात याविषयी सल्ला दिला आहे.

sleep

स्त्रियांना झोपेची जास्त गरज का? (Why do women need more sleep than men?)

जैविक फरकांमुळे, पुरुष आणि स्त्रियांच्या झोपेच्या गरजा थोड्या वेगळ्या असू शकतात, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघेही त्यांचे दिवस कसे घालवतात हे पाहणे त्यासाठी गरजेचे आहे. संशोधनानुसार स्त्रिया आणि पुरुष काम ,सामाजिक कर्तव्ये आणि कौटुंबिक काळजी यासाठी वेगवेगळे वेळ देतात, डॉ डे म्हणाले, स्त्रिया पुरुषांपेक्षा ११ ते १३ मिनिटे जास्त झोपतात, पण, पुरुष खूप गाढ झोपतात. मध्यरात्री कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांची गरज जास्त असते. जेव्हा कुठलीच अडचण नसते तेव्हा त्या गाढ झोपतात. दिवसभरात त्या कधीही डुलकी काढू शकतात. मात्र त्यांची झोपण्याची एकूण वेळ ही दिशाभूल करणारी असते. कारण दिवसा डुलकी घेतल्याने झोपेची वेळ वाढते परिणामी रात्री झोप उशीरा आणि कमी लागते.

partner sleep

झोपेच्या कमतरतेचे परिणाम (Repercussions of sleep deprivation)

महिलांना पुरुषांपेक्षा सरासरी जास्त झोप लागते. खराब झोपेचे परिणाम पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त गंभीर असतात. अनेक संशोधनानुसार कमी झोप घेतलेल्या किंवा झोपेपासून वंचित राहिलेल्या स्त्रियांना उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, हृदयविकाराचा झटका, तणाव आणि मानसिक आरोग्य समस्यांचा धोका जास्त असतो, असे दिसून आले आहे. यामुळे गोंधळ उडणे, थकवा येणे आणि उत्साहाचा अभाव होऊ शकतो. या सर्वांचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे स्त्रियांना लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.

Sleep

स्त्रियांना पुरूषांपेक्षा किती जास्त झोपेची गरज आहे? (How much more sleep do women need compared to men?)

व्यक्तीनुसार झोपेच्या गरजा वेगवेगळ्या असतात. याविषयी काही अभ्यास झाले आहेत. त्यानुसार स्त्रियांना त्यांची जीवनशैली, आरोग्य आणि तंदुरूस्तीच्या गरजा, कार्ये, प्रत्येक टप्प्यावर हार्मोनल बदल यामुळे झोपेची कमतरता भरून काढणे गरजेचे असते. त्यासाठी त्यांना पुरूषांपेक्षा २० ते ३० मिनिटे जास्त झोप लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

SCROLL FOR NEXT