Drinking Water 
health-fitness-wellness

थंडीच्या दिवसांत कमी होऊ देऊ नका शरीरातील पाणी; हे आहेत काही सोपे उपाय

सकाळवृत्तसेवा

थंडीच्या दिवसात स्वत:ला आरोग्यदायी ठेवण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणं खुप आवश्यक असतं. हिवाळ्यात सामान्यत: खुपच कमी घाम येतो. मात्र या ऋतूत देखील आवश्यक तेवढं पाणी पिणं खुप महत्त्वाचं ठरतं. ऋतू कोणताही असो शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उत्पन्न होऊ लागतात. मात्र थंडीच्या दिवसात संपूर्ण दिवस पाणी पिणं इतकंही सोपं नसतं. मात्र, हे शरिरासाठी तितकंच आवश्यक ठरतं जितकं आवश्यक गरम कपडे परिधान करणं असतं. हिवाळ्यात हवा ड्राय असल्याकारणाने शरीरा डिहायड्रेशनची समस्या उत्पन्न होऊ शकते. यामुळे आपल्या शरिरावर नकारात्मक परिणाम होऊ लागतो. आपण आज जाणून घेऊयात थंडीच्या दिवसात अधिक पाणी पिण्याचे काही सोपे उपाय...

  • थंडीच्या दिवसात वजन घटवणे अत्यंत कठीण काम असतं. याचं कारण असं आहे की या ऋतूत आपण खूपच कमी पाणी पितो. मात्र, स्वत:ला हायड्रेट ठेवल्याने चरबी घटते आणि वजन कमी होते.
  • थंडीच्या दिवसात देखील त्वचेला आरोग्यदायी आणि चमकदार बनवलं जाऊ शकतं. रेग्यूलर पाणी पिल्याने शरीर अधिक घाण बाहेर काढतं. लघवी साफ होते आणि यंत्रणा आतून स्वच्छ होते.
  • सर्दी आणि थंडीच्या दिवसांत आवश्यक  पाणी पिल्याने शरीराचे तापमान रेग्यूलेट होतं. थंडीत पाणी पिल्याने आपण जास्त काळासाठी गरमी अनुभवू शकतो.
  • सामान्यत: थंडीच्या काळात थंडी आणि शुष्क हवेमुळे आपल्याला अधिक सुस्ती आणि आळस जाणवतो. पण आवश्यक तेवढं पाणी पिल्याने आपण ताजेतवाने आणि उर्जावान बनू शकतो.
  • थंडीच्या दिवसात खुप पाणी पिल्याने शरिरात संक्रमण होत नाही. सोबतच सर्दी आणि खोकला या समस्येपासूनही सुटका होते.
  • स्वत:ला हायड्रेट ठेवण्याचे सोपे उपाय
  • सूप हा पदार्थ केवळ आरोग्यदायीच नसतो तर तो शरीरातील पाण्याचे मात्राही वाढवतो. यामुळे शरिराला गरमपणा मिळतो.
  • जर आपण थंड पाणी पिऊ शकत नसाल, तर ग्रीन टी किंवा कोमट पाण्यात मध घालून प्यावं.
  • पाण्याचे अधिक प्रमाण असलेली फळे आणि भाज्यांचे सेवन करा. स्ट्रॉबेरी, संत्री, टोमॅटो हे सर्दीच्या दिवसांसाठी चांगले पर्याय आहेत.
  • अल्कोहोल आणि कॉफीचे सेवन करु नये. यामुळे शरिर डिहायड्रेट होऊ शकतं.
  • आपल्या जवळ कायम पाण्याची बॉटल ठेवा. तसेच दररोज आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT