महिलांनो, हिवाळ्यात घ्या आरोग्याची काळजी! Sakal
health-fitness-wellness

हिवाळ्यात आरोग्याची काळजी! पौष्टिक आहारासह सांध्यांना हवी मालिश

महिलांनो, हिवाळ्यात घ्या आरोग्याची काळजी! पौष्टिक आहारासह सांध्यांना हवी मालिश

प्रकाश सनपूरकर

हिवाळा ऋतूमध्ये महिलांची त्वचा रुक्ष पडण्याची शक्‍यता असते. तापमान कमी झाल्याने हा परिणाम होतो.

सोलापूर : हिवाळ्यात (Winter) त्वचेची रुक्षता घालवून तजेलदारपणा जपणे, सांधेदुखीसाठी तेल मालिश उपयुक्त व उडदाच्या लाडूसारख्या उत्तम पदार्थांचे सेवन करणे महिलांसाठी गरजेचे आहे. दसऱ्यानंतर आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. दिवाळीनंतर (Diwali) पुढे संक्रांतीपर्यंत (Sankranti) हिवाळ्याचा कालावधी असतो. या कालावधीत वातावरण आल्हाददायक असते. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये महिलांची त्वचा रुक्ष पडण्याची शक्‍यता असते. तापमान कमी झाल्याने हा परिणाम होतो. त्यासाठी महिलांना विशेष काळजी घ्यावी लागते.

दररोज सकाळी तुळस व अद्रकाचा काढा घ्यावा. तसेच अभ्यंगस्नानामुळे त्वचेला चांगला उजाळा मिळू शकतो. बेसन पीठ, कोरफड, दूध, चंदनाचे लेप त्वचेवर लावल्यास त्वचेची रुक्षता कमी होऊ शकते. तसेच तिळाचे तेल व इतर तेलाचे प्रकारदेखील उपयुक्त ठरू शकतात. त्वचा बाहेरून रुक्ष पडू नये म्हणून तेल व लेपांचा उपयोग होतो. तसेच त्वचेचा रक्तप्रवाह चांगला राहिल्यास त्वचेचा उजळपणादेखील टिकून राहतो. हिवाळा असला तरी भरपूर पाणी प्यावे. कोमट पाणी नियमित प्यावे म्हणजे ते तब्येतीसाठी उपयुक्त राहाते.

या ऋतूत आहाराची काळजी घ्यावी. उडदाच्या लाडूचा आहार घेणे योग्य ठरते. सुका मेव्याचे सर्व प्रकार, दूध, दही, तुपाचा आहारात समावेश असावा. तसेच या ऋतूत असलेली सर्व फळेदेखील आहारात असावीत. या कालावधीत ऊस खाणेदेखील लाभदायी ठरते. स्वयंपाकात महिलांनी धने, लवंग, लसूण व मसाल्याचे पदार्थ वापरण्यास अडचण नाही. नियमित चालणे व योगासने करावीत.

त्वचेची अशी घ्या काळजी

या कालावधीत थंड हवामानामुळे त्वचा अत्यंत कोरडी पडते. तेव्हा त्वचेला बेसन पीठ, कोरफड, चंदन, दुधाचा वापर करून लेपन करावे. त्यामुळे त्वचा उजळून निघेल. तसेच भरपूर पाणी प्याल्यास त्वचेचा तजेलदारपणा राहण्यास मदत होते.

ठळक बाबी...

  • सांध्यांना पुरेशी तेलाची मालिश करावी

  • अभ्यंगस्नानाचा उपयोग आरोग्यदायी

  • तीळ, शेंगदाणे, खोबरे यांच्या चटण्या व लाडूचे पदार्थ करावेत

  • मांसाहारीसाठी अंडे, मांस, चिकन उपयुक्त

  • सर्व पदार्थात गुळाचा वापर भरपूर असावा

  • गाजर, पेरू, बोरे, ऊस खाणे योग्य

  • आहारात लसूण, खोबरे, शेंगदाणा व तिळाच्या चटण्या वापराव्यात

  • बाजरीची भाकरी उपयुक्त

दिवाळीसारखे सण असताना महिला कामात व्यस्त असल्या तरी हिवाळ्याच्या ऋतूसाठी त्यांनीदेखील भरपूर पौष्टिक आहार घेतला पाहिजे. त्वचेची काळजी घेणे याच कालावधीत महत्त्वाचे ठरते. सांध्यांना तेलाची मालिश, अभ्यंगस्नान व त्वचेला लेपन करण्याकडे दुर्लक्ष करू नये.

- प्रा. डॉ. शिल्पा येरमे, आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

हिवाळ्यात तिळाचा उपयोग भरपूर प्रमाणात केला पाहिजे. या कालावधीत महिलांनी अनावश्‍यक उपवास टाळावेत. अभ्यंगानंतर गरम पाण्याने स्नान करावे. संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी मालिश करावी.

- प्राचार्य डॉ. साहेबराव गायकवाड, एम. डी. (कायाचिकित्सा), सोलापूर

आहारासोबत महिलांनी त्वचेची निगा राखण्यासाठी हळद, चंदन, लिंबू, मध, साय व दुधाचे मिश्रण चेहऱ्यावर वापरावे. ओठावर लोणी व मीठ लावल्यास ते कोरडे पडत नाहीत. कोरफड, बदाम, ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण त्वचेवर लावावे.

- डॉ. मधुरा कुलकर्णी, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT