Yoga 
health-fitness-wellness

योगासने आणि फायदे

सकाळ वृत्तसेवा

योगासने केल्याने फक्त शरीरच तंदुरुस्त राहत नाही, तर त्यामुळे मनःशांती, तजेलदार त्वचा मिळते. तसेच वजनातही घट होते. योगासने करण्याला वयाची कोणतीही मर्यादा नसते. फक्त तुमच्या शरीरयष्टीनुसार व तुम्हाला असलेल्या व्याधींनुसार योगासने निवडावीत. लक्षात घ्या, योगासने दीर्घकाळ फायदे देतात. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योगासनाला जीवनाचा एक भाग करून घेणे गरजेचे आहे. यामुळे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.

फक्त शारीरिक स्वास्थ्य असून चालणार नाही, तर मानसिक स्वास्थ्यही गरजेचे आहे. अशा वेळी योगासनेच तुम्हाला मदत करू शकतात. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्‍वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यानधारणा या गोष्टी उत्तम आरोग्य राखायला उपयोगी पडतात.

सूर्यनमस्कार, कपालभाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याचा अंदाज आपल्याला येतो.

आपली यंत्रणा ही शरीर, मन आणि आत्मा या तिघांपासून बनलेली असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात, तसेच मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगासनांमुळे इतर अवयवांना व स्नायूंना बळकटी देण्यात येते. श्‍वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रांमुळे आणि ध्यानधारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी DJ अंगावर कोसळला, ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Vidyanand Bapat : पुण्यात दहीहंडी उत्सवात विद्यानंद बापट यांचा AI व्हिडिओ, मिस्टर बिन यांचा देखील फोटो लावला

पालिका मुख्यालयातच शिवसेना शाखाप्रमुखाची भाजप नेत्याला धक्काबुक्की, पायऱ्यांवरून ढकलत हल्ल्याचा प्रयत्न; Video Viral

Marathi News Live Updates: डीजे आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकर पुन्हा रस्त्यावर उतरणार; बालगंधर्व चौकात उद्या आंदोलन

Ara 36 Grapes : अमेरिकेवरून भारतात आलेलं 'हे' द्राक्ष वाण शेतकर्‍यांना बनवतंय लखपती! प्रतिकिलोला मिळतोय 160 ते 200 रुपयांचा दर; पाहा काय आहे वैशिष्ट्य

SCROLL FOR NEXT