naukasana 
health-fitness-wellness

Daily योग : वजनवाढीने त्रस्त आहात?; मग नियमित करा नौकासन

आज अनेकजण मधुमेह, कोलेस्ट्रॉल, वाढतं वजन या समस्यांनी त्रस्त आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बदलत्या काळाप्रमाणे आपल्या आहार आणि विहार या दोघांमध्येही बदल झाला आहे. घरी तयार केलेले पौष्टिक व सकस पदार्थ सोडून आपला कल फास्टफूडकडे वळला आहे. चवीने रुचकर आणि चमचमीत वाटणारे हे पदार्थ डोळे आणि जीभ यांना कायमच आकर्षित करत असतात. परंतु, हे पदार्थ कितीही छान वाटत असले तरीदेखील त्याचे शरीरावर होणारे परिणाम हे गंभीर आहेत. आज अनेकजण मधुमेह, कोलेस्ट्रॉल, वाढतं वजन या समस्यांनी त्रस्त आहेत. म्हणूनच या समस्यांवर मात करायची असेल तर नियमितपणे योग किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे वजन कमी करण्यासाठी योगासनांमधील नौकासन हे आसन अत्यंत प्रभावी ठरत आहे. हे आसन नियमित केलं तर वाढलेलं वजन नियंत्रणात येतं. सोबतच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत करतं. (yoga-poses-naukasana-for-weight-loss)

नौकासनाचे फायदे -

१. ओटीपोट आणि मांड्यांमधील स्नायू बळकट होतात.

२. पचनसंस्थेतील रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होते.

३. हात व पाय यांचे स्नायू बळकट होतात.

४. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

५. खांदे, मान, पार्श्वभाग यांचे स्नायू मजबूत होतात.

६. वजन नियंत्रणात राहते.

७. शरीराचं संतुलन राखण्यास मदत मिळते.

नौकासन करण्याची योग्य पद्धत

नौकासन करण्यासाठी प्रथम पाठीवर झोपावे. त्यानंतर दोन्ही हात, डोके आणि पाय एका सरळ रेषेत वर उचलावे. आपले पाय जमिनीपासून ४५ अंश कोनात वर उचलावेत. आणि, शरीराचा वरचा भाग पायांसोबत कमरेत काटकोन करेल अशा पद्धतीने उचलावा. (हे करत असताना तुमच्या शरीराची स्थिती एका नौकेप्रमाणे भासत असेल.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT