health-fitness-wellness

Video : माझा फिटनेस : हेल्दी जीवनशैलीचा फायदाच! 

झेबा शेख, मॉडेल

मी दररोज दीड तास वर्कआऊट करते आणि रविवारी सुटी न घेता इतर ऍक्‍टिव्हिटी करत असते. सायकलिंग आणि स्वीमिंग करते. तसेच, ट्रेकिंगला जाते. त्यामुळे माझा मूडही फ्रेश असतो. त्यातून मला एनर्जी मिळते. मी वर्कआऊटनंतर प्रोटिन शेक घेते. झटपट होणारे पदार्थ डाएटमध्ये घेते. नाश्‍त्यामध्ये ऑम्लेट, दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे आणि रात्रीच्या जेवणात पनीर किंवा वरण-भात आणि सॅलड घेते. सर्वच आहारांत सॅलड जास्त प्रमाणात घेते. संध्याकाळी बदाम किंवा फळे खाते. मी दिवसभरात चार लिटर पाणी पिते. प्रवासातही पाण्याची बाटली माझ्याजवळ असते. आहारामध्ये अधूनमधून मल्टी व्हिटॅमिन आणि माशांचे तेल घेते. बेकरीचे पदार्थ आणि फास्ट फूड शक्‍यतो खात नाही. व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी घेते. सकाळी लवकर वर्कआऊट करते. त्यामुळे मला माझ्या कामांसाठी खूप वेळ मिळतो. मी रात्री लवकर झोपते.

मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी मी स्वीमिंग करते. त्याचप्रमाणे पाण्यामध्येच ध्यानधारणा करते. त्याचा मला खूप फायदा होतो. आपण तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. त्यासाठी मी माझे वजन अन्‌ आरोग्य तपासणी नियमीत करते. त्यामुळे मला मिळालेल्या प्रोजेक्‍टवर फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. मी अनेक अल्बम अन्‌ सॉंग केले आहेत. त्यामध्ये माझ्या हेल्दी लाइफस्टाइलचा फायदाच झाला आहे.

माझ्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचाही चांगला फायदा होतो. मी मायकल वॅजक्वे याला माझा फिटनेसचा आदर्श मानते. मी त्याचे बहुतांश वर्कआऊट फॉलो करते. ते मला खूप कामी येतात. त्यामुळे मी आनंदी राहते आणि माझा अर्धा व्यायाम येथेच होतो. मी कुटुंबीयांबरोबरही अनेकदा फिटनेसबाबत चर्चा करते. त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबीयांवरही होतो. 

शब्दांकन - अरुण सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT