health-fitness-wellness

झुम्बा नृत्यातून झिंगाट व्यायाम

सकाळ डिजिटल टीम

झुम्बा नृत्य हा व्यायामाचा अनोखा व आनंददायी प्रकार आहे. या नृत्याचे प्रणेते अल्बर्टो पेरेझ नुकतेच पुण्यात येऊन गेले. प्रशिक्षक तयार करून या नृत्याचा प्रसार करण्याचे काम पुण्यातूनही चालत असून, श्वेबता कुलकर्णी हे वर्ग घेतात. त्यांच्याशी संवाद साधून हे नृत्य, त्याचे फायदे आणि प्रसाराचा घेतलेला मागोवा...

तुम्हाला उडत्या चालीच्या गाण्यांवर नाचणे आणि तालबद्ध हालचाली करणे (किंवा न करणेही) आवडत असल्यास व्यायाम तुमच्यासाठी एक काम राहात नाही. नृत्या आणि व्यायाम एकत्र करण्याचे श्रेय झुम्बा नृत्याचा प्रणेता अल्बर्टो पेरेझ यांना जाते, मात्र याच नृत्याने जगभरातील अनेकांना प्रेरणा दिली असून, त्यांचे जगणे अधिक सुदृढ आणि आनंदी केले आहे.

पुण्यातील झुम्बा मास्टर इन्स्ट्रक्टर श्वेेता कुलकर्णी त्यांपैकीच एक. त्यांनी हा नृत्यप्रकार अमेरिकेतील वास्तव्यात करण्यास सुरुवात केली. ''मी झुम्बा नृत्याचा शोध लागला आणि माझे वजन ३० किलोने कमी झाले. मी मे २०११मध्ये भारतात परतले आणि मी पुण्यात झुम्बा नृत्याचे क्लास शोधण्यास सुरुवात केली. मी झुम्बा डॉट कॉमवर शोध घेतला आणि मला फक्त मुंबईमध्ये एक प्रशिक्षक सापडला,'' असे श्वेृता कुलकर्णी सांगतात. नंतरच्या काळात त्या स्वतःच झुम्बा एज्युकेशन स्पेशालिस्ट (झेडईएस) आणि प्रशिक्षक बनल्या. ''मी प्रशिक्षक म्हणून काम सुरू केल्यानंतरचा काळ कठीण होता, कारण कोणालाच हे नृत्य शिकायचे नव्हते. त्यांना एरोबिक्स आणि स्टीप एरोबिक्समध्यचे रस होता. भारतातील पहिल्या ५० झुम्बा प्रशिक्षकांनी हा व्यायामप्रकार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली,'' असे श्वेाता सांगतात. झुम्बा कंपनीला इन्स्ट्रक्टर बेस्ड मॉडेल बनविणे हे अल्बर्टो पेरेझ ऊर्फ बेटो, त्यांचे पार्टनर अब्लर्टो पर्लमॅन आणि अल्बर्ट अघिऑन यांचे स्वप्न होते. कोलंबियामध्ये जन्मलेले बेटो मागील महिन्यातच पुण्यात येऊन गेले या नृत्याचे बेसिक आणि मास्टरक्लासचे प्रशिक्षण देऊन गेले. ते म्हणतात, ''लोकांनी माझ्या मायामी आणि अमेरिकेतील वर्गांना प्रवेश घेण्यास सुरुवात केल्यानंतर आमच्याकडे जीम व कॉर्पोरेटमध्ये हा नृत्य व व्यायामप्रकार घेऊन जाण्याचा पर्याय खुला होता. मात्र, आम्ही हा प्रकार इन्स्ट्रक्टर बेस्ड मॉडेल करण्याचा निर्णय घेतला. आमची स्वतःची वेबसाइट आहे. तुम्ही तुमच्या शहरात किंवा देशात झुम्बा क्लासचा शोध घेऊ शकात. आम्ही इन्स्ट्रक्टर्सना प्रशिक्षण देऊन तयार करतो. थोडी फी घेऊन त्यांना नृत्य आणि संगीताचे सर्व प्रकार शिकवतो. त्यानंतर ते नव्या लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी तयार होतात आणि झुम्बा इन्स्ट्रक्टर नेटवर्कचे (झेडआयएन) सदस्य बनतात. आमच्याकडे झुम्बा एज्युकेशन स्पेशालिस्ट हा एक भाग आहे. हे सर्व इन्स्ट्रक्टर्स आमचे बिझनेस पार्टनरही आहेत.''

भारतामध्ये सध्या १६ मास्टर ट्रेनर्स आहेत. श्वे)ता कुलकर्णी पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, औरंगाबाद आणि नांदेडसारख्या छोट्या शहरांची जबाबदारीही सांभाळतात. कुलकर्णी सांगतात, ''मी सुरवात केली, त्याकाळी संपूर्ण देशात एकच इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग प्रोग्राम होता. बेटो २०१५ मध्ये सर्वप्रथम भारतात आले आणि झुम्बा नृत्याला मोठी गती मिळाली. त्यानंतर झुम्बा एज्युकेशन स्पेशालिस्टही आले. आता भारतात १७ स्पेशालिस्ट आहेत. सुचेत्रा पाल या पहिल्या स्पेशालिस्ट आहेत आणि त्या टीमचे नेतृत्वही करतात.'' श्वेाता कुलकर्णी २०१५ मध्ये पुणे आणि महाराष्ट्रासाठीच्या झुम्बा एज्युकेशन स्पेशालिस्ट झाल्या. त्या सर्व शहरांत प्रवास करून झुम्बाचे नृत्यप्रकार योग्यपद्धतीने घेतले जात आहेत, याची दक्षता घेतात. ''आमची टीम मोठी होत आहे, तसा हा कार्यक्रम अधिक चांगला होतो आहे. लोकांना आता आपल्याला क्लास आणि नृत्याच्या कार्यक्रमांचे मार्गदर्शन करण्यासाठी एक नेत आहे, हा विश्वाआस निर्माण झाला आहे. जेव्हा मी एखादा कार्यक्रम आयोजित करते, तेव्हा माझ्या सर्व इन्स्ट्रक्टर्सना घेऊन येते. सर्व टीम एकत्र आल्यावर खूपच मोठा फरक पडतो,'' असे कुलकर्णी सांगतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संगीत झुम्बाला इतर नेहमीच्या व्यायामांपेक्षा वेगळे करते. आपल्या दौऱ्यादरम्यान आपण नवीन चालींचा शोध लावण्यासाठी १० संगीतकारांबरोबर काम केल्याचा उल्लेख बेटो यांनी केला आहे. त्यांनी बादशहा या रॅपरबरोबर काम करून पाश्चिमात्य जगतातील अनेक श्रोत्यांपर्यंत पोचवले. त्यांनी रिगाशी बांधलेली भांगडा चालही सादर केली. हा ५० वर्षीय संस्थापक म्हणतो, ''झुम्बामध्ये लॅटिनो संगीताचा समावेश आहे. त्यात सालसा, मेरिंग्यू, बचाता, रिगॅथॉन ५० टक्के असून, मी लॅटिनो संगीत इतर प्रकारांशी जोडण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे खूप प्रकार आहेत.'' झुम्बा भारतीयांमध्ये खूप वेगाने पसरला आहे. मी सुरुवातीला कंपनी केवळ लॅटिनो नृत्यशैली पाठवत असे. छोट्या शहरातील लोक या संगीताचा स्वीकार करू शकत नव्हते. त्यानंतर कंपनीने संगीताची आपली बॅंक विकसित करण्यास सुरुवात केली. झेडआयएन आणि झेडईएसकडून सूचना स्वीकारणेही सुरू झाले आणि आज तुम्हाला 'झेडआयएन व्हॉल्युम' मिळाल्यास आंतरराष्ट्रीय नृत्य शैलीत भांगड्याचे मिश्रण केलेले आढळेल. अशा प्रकारे सोलापूर, कोल्हापूर आणि इतर शहरांतील लोकांमध्येही आमच्याशी अधिक जोडले गेल्याची भावना आहे,'' असे कुलकर्णी म्हणतात. भारतातील टायर - २ शहरांमध्ये हा नृत्याचा व्यायाम कसा लक्ष वेधतोय, हे सांगताना त्या म्हणाल्या, ''आम्हाला सुरुवातीला कोल्हापूर, सोलापूरमधून प्रामुख्याने नृत्य दिग्दर्शन करणाऱ्या डान्सरकडून प्रतिसाद मिळाला. ते आपल्या विद्यार्थ्यांना झुम्बाच्या नावाखाली बॉलिवूड किंवा आंतरराष्ट्रीय गीते शिकवत असत. मात्र, बेटोच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओनंतर सोशल मीडियावरून जागरूकता निर्माण होताच लोकांनी 'आप झुम्बा सिखोओ ना' अशी मागणी करण्यास सुरुवात केली. या डान्सरनी आपल्याला झुम्बाचा परवाना आणि प्रमाणपत्र मिळेल, हेही ओळखले. तेव्हा ही संख्या वाढली. सांगली आणि कोल्हापुरात आमचे ५ हजार २०० सदस्य असून, ७२ झेआयएन आहेत. सोलापूरमध्ये आम्हाला ५२ प्रशिक्षक मिळाले.

झुम्बा आणि 'बेटो'बद्दल...
ही वाटचाल सुरू असतानाच कोलंबियातील बेटो या ॲरोबिक प्रशिक्षकाची संगीताची टेप विसरली. त्यानंतर त्याला आपल्या वैयक्तिक लॅटिनो संगीतावर अवलंबून राहावे लागले. या सालसा, मेरिंग्य आदींचा समावेश असलेल्या लॅटिनो म्युझिकवर त्याचा वर्ग मंत्रमुग्ध झाला. तेव्हा तो फक्त १६ वर्षांचा होता. त्यानंतर बेटो अमेरिकेतील मियामीला गेला. तेथे आपला व्यावसायातील भागीदार अल्बर्टो पर्लमॅन त्याला भेटला. अल्बर्टोची आई माझी विद्यार्थी होती आणि ती म्हणाली, ''माझ्या मुलाला व्यवसायाची ऑफर आहे.'' मी यावर म्हणालो, ''नक्कीच, का नाही''. अल्बर्ट अघिऑन हा आमचा तिसरा भागीदार आहे. निरनिराळ्या कृती करण्याचे काम त्याच्याकडे असते. आमच्या तिघांचीही नावे अल्बर्टो आहेत, ही गमतीची गोष्ट. आम्हाला लोकांना आनंदी करण्याची इच्छा आहे. त्यांनी व्यायाम करण्याचा आनंद घ्यावा. सध्या जगातील १८० हून अधिक देशांमध्ये झुम्बाचा अब्जावधी डॉलरचा व्यवसाय असून, १५ लाख लोक या चळवळीचा भाग बनले आहेत. या यशाचे रहस्य विचारल्यावर बेटो म्हणतात, ''आमचे संगीत प्रफुल्लित करणारे असून मौज निर्माण करते. त्यासाठी तुम्हाला झुम्बा शिकण्यास सक्षम असणारे डान्सर असण्याची गरज नाही. तो कुणीही शिकू शकतो. पण, त्याचा सराव मात्र गरजेचा आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT