Fennel seeds sakal
आरोग्य

Fennel seeds: बडीशेप आरोग्यासाठी ठरते फायदेशीर; ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे

वजन कमी करणे हे आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान बनलेआहे.

Aishwarya Musale

तुम्ही बडीशेप खूप वेळा सेवन करत असाल. कधी ते जेवणात वापरतात तर कधी माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खातात. पण, बडीशेप खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बडीशेपचे सेवन केल्याने केवळ वजन कमी होत नाही तर आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्या दूर करण्यातही ते फायदेशीर ठरते. चला, मेडिकल न्यूज टुडेच्या वृत्तानुसार, बडीशेप खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

हाडे मजबूत करते: बडीशेपमध्ये आढळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे हाडांची रचना आणि ताकद वाढवण्यास मदत करतात. यामध्ये फॉस्फेट, कॅल्शियम, लोह, झिंक, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन 'के' हाडांच्या विकासासाठी मदत करतात. तसेच, ते हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यात खूप मदत करतात.

रक्तदाब कमी करण्यास मदत करते: बडीशेपमध्ये असलेले पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करू शकतात. यासोबत, बडीशेपमध्ये नायट्रेट्स असतात जे वासोडिलेटरी आणि व्हॅसोप्रोटेक्टिव्ह गुणधर्मांनी समृद्ध असतात. 2018 च्या अहवालानुसार नायट्रेट सप्लिमेंट घेतल्यावर रक्तदाब कमी होऊ शकतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर : बडीशेप हृदयासाठीही खूप फायदेशीर ठरू शकते. बडीशेपमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. हे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. कारण ते रक्तातील एकूण सीरम कोलेस्टेरॉल आणि लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.

अशा प्रकारे बडीशेपचे सेवन करा: आहारात बडीशेप समाविष्ट करण्यासाठी तुम्ही बडीशेपच्या पाण्याची मदत घेऊ शकता. तसेच, बडीशेप चहा बनवून, तुम्ही बडीशेप सेवन करू शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. एवढंच नाही तर बडीशेपचे, पाने आणि फुलं यांचाही बडीशेप चहा बनवता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT