Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : थकवा जाण्यासाठी केवळ 7 तासांची झोपच नाही तर या 7 प्रकारच्या रेस्टची असते गरज

बऱ्याचदा रात्री पूर्ण झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतो. याचे कारण आणि उपाय जाणून घ्या.

सकाळ डिजिटल टीम

7 Factors of Complete Sleep : बऱ्याचदा असं होतं की, वेळेवर झोपून पूर्ण झोप घेऊन उठत आहात. वेळेवर जेवत आहात तरीही थकवा जात नाही. सकाळी उठून थकवा जात नाही, फ्रेश वाटत नाही. असं का होतं याचं उत्तर तज्ज्ञ मंडळी सांगतात की, फक्त झोप पुरेशी नाही तर अजून ७ प्रकारची रेस्ट आवश्यक आहे. जाणून घेऊया.

Health Tips

Physical Rest : शारीरिक आराम दोन प्रकारचे असतात. एक निष्क्रीय (Passive) आणि दुसरं सक्रीय (Active). निष्क्रीय आरामात झोपणं, डुलकी घेणं हे येतं. तर सक्रीय शारीरिक आराम म्हणजे योग, स्ट्रेचिंग आणि मसाज थेरपी सारख्या गोष्टी ज्यामुळे शारीराला आराम मिळतो.

Mental Rest : तुम्ही बघितलं असेल की, काही लोक ऑफीसमध्ये आल्या आल्या दिवसाची सुरुवात मोठ्याशा कॉफी मग सोबत करतात. असे लोक बहुतेकदा चीडचीडे आणि विसराळू असतात. अशा लोकांना मानसिक आरामाची गरज असते. यासाठी नोकरी सोडणे किंवा सुट्टीवर जाण्याची गरज नसते तर कामात प्रत्येक दोन तासाने घेतल्या जाणाऱ्या ब्रेकला शेड्युल करा. हा ब्रेक तुम्हाला शांत रहायला मदत करेल.

Health Tips

Sensory Rest : डोळे दीपवणारा प्रकाश, कंप्युटर स्क्रीन, मागचा गोंधळ, चर्चा मग ते ऑफीस असो किंवा झूम कॉल याचा ताण आपल्या सेंसेसवर येतो. यातून आराम दिवसभरात एक मिनीट डोळे बंद करून मिळू शकतो. यासाठी दिवसाच्या शेवटी सगळे गॅजेट्स बंद करून आपल्या सेंसेस ला आराम द्या.

Creative Rest : जर काही समस्या असेल तर त्यावर विचार मंथन करणे आवश्यक असते. क्रीएटिव्ह गोष्टी केल्याने आतून होणाऱ्या आनंदाने तुम्ही फ्रेश होतात. नवी प्रेरणा मिळते. तुमच्या आतली क्रिएटीव्हीटी बाहेर निघाल्यावर होणारा आनंदच तुम्हाला आराम देतो.

Health Tips

Emotional Rest : सतत दुसऱ्यांना आनंद देण्याचा विचार करत बसण्यात स्वतःला जे वाटतं ते व्यक्त व्हायचं राहून जातं. अशा व्यक्तींना या भावनिक आरामाची गरज असते. आत खूप काही साठलेलं असतं ते काढून टाकणं गरजेचं असतं. त्यातून आरामदायक वाटतं.

Social Rest : जर कोणाला इमोशनल रेस्टची गरज आहे तर त्याला सोशल रेस्टचीपण गरज असू शकते. बऱ्याचदा सकारात्मक नाती आणि नकारात्मकता यात भेद करता येत नाही. अशावेळी काही काळ एकटं राहणं आवश्यक असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

Pune Crime : ‘एनएचएम’ मधील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोटयावधींचा गंडा; नोकरीत कायम करण्‍याच्‍या नावाखाली उकळले ७५ कोटी

Pakistan admits: मोठी बातमी! अखेर पाकिस्तानला कबूल करावंच लागलं ; 'अमेरिकेच्या मध्यस्थीसाठी कधीच तयार नव्हता भारत'

SCROLL FOR NEXT