Heart Attack google
आरोग्य

Heart Attack : अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने दरवर्षी ७ लाख मृत्यू; ही आहेत कारणे

दरवर्षी अचानक हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू होण्‍याची ७ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जातात.

नमिता धुरी

मुंबई : सडन कार्डियक अरेस्ट (एससीए) जागरूकता महिन्याच्या पार्श्वभूमीवर अग्रगण्य कार्डियोलॉजिस्‍ट्सनी (हदयरोग तज्ञ) या स्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला आहे. भारतात, विशेषत: तरुण वयोगटांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अंदाजानुसार, दरवर्षी अचानक हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू होण्‍याची ७ लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जातात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्‍ल्‍यूएचओ) च्‍या मते, सीव्‍हीडीमुळे होणारे ८६ टक्‍के मृत्‍यू प्रतिबंध आणि उपचारांद्वारे टाळता येऊ शकतात. हे पाहता अनेक जीवनशैली पद्धतींचा कार्डियोव्‍हॅस्‍कुलर (हृदय व रक्‍तवाहिन्‍यासंबंधित) आरोग्यावर परिणाम होतो.

बॉम्‍बे हॉस्पिटल अॅण्‍ड मेडिकल रिसर्च सेंटरचे कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. नागेश वाघमारे म्‍हणाले, “धूम्रपान सारखी अनारोग्‍यकारक जीवनशैली, शारीरिक व्‍यायामाचा अभाव, उच्‍च रक्‍तदाब व कोलेस्‍ट्रॉल, लठ्ठपणा आणि मादक पदार्थांने व्‍यसन हे जोखीम घटक असू शकतात.

यासह वय (पुरुषांसाठी ४५ वर्ष आणि महिलांसाठी ५५ वर्षांपेक्षा जास्त) आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास किंवा पूर्वीच्या हृदयविकाराचा इतिहास देखील संभाव्य कारणे असू शकतात.’’

ते पुढे म्हणाले, “दररोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्‍यक्‍तीने दररोज वेगवान चालले पाहिजे आणि त्यानंतर सायकलिंग, पोहणे व आवडीनुसार जॉगिंग सारखे व्‍यायाम केले पाहिजेत. हे व्यायाम हृदयासाठी अत्यंत आरोग्यदायी असतात.

यासह, योग्य पोषण व दररोज पुरेशी झोप, ज्यामध्ये दिवसातून ७ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे. जीवनाच्या विविध पैलूंमध्ये धमाल आनंद घेतल्‍याने तणाव दूर होऊ शकतो आणि तणावाची पातळी कमी होऊ शकते, म्हणून जीवनात असे आनंद घेण्‍याला प्राधान्‍य द्या.’’

लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सडन कार्डियक अरेस्‍ट हा हार्ट अॅटॅकपेक्षा वेगळा आहे, जे रुग्णाच्या एक किंवा अधिक हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यामुळे होते. कार्डियक अरेस्‍ट सामान्यतः हृदयाच्या असामान्य लयीमुळे होतो, जो आपल्या हृदयाची इलेक्ट्रिकल सिस्टिम योग्यरित्या कार्य करत नसल्यास उद्भवतो.

पण अॅक्‍यूट हार्ट अॅटॅक कधी-कधी अधिक ताण निर्माण होण्‍यास कारणीभूत ठरू शकतो, ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येतो. पाश्चिमात्य देशांतील व्‍यक्‍तींना त्यांच्या वयाच्‍या ६०व्‍या वर्षी हृदयविकाराचा झटका येतो, तर भारतातील व्‍यक्‍तींना वयाच्‍या ५०व्‍या वर्षी हृदयविकाराचा झटका येण्‍याचे निदर्शनास आले आहे.

हृदयविकाराचा झटका कसा ओळखावा, त्याला प्रतिसाद कसा द्यावा आणि त्यावर उपचार कसे करावे हे जाणून घेतल्याने एखाद्याचे प्राण वाचू शकतात.

फोर्टिस हेल्‍थकेअरचे इंटरवेन्‍शनल कार्डियोलॉजी डॉ. विवेक महाजन म्‍हणाले, ‘’रूग्‍ण एससीएमधून वाचले आहेत, पण त्‍यांना पुन्‍हा एससीए येण्‍याचा धोका आहे अशा केसेससंदर्भात किंवा पूर्वीच्‍या हार्ट अॅटॅकच्‍या केसेसमध्‍ये हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी व सुधारण्यासाठी, तसेच सामान्य हृदय गती पुनर्संचयित करण्यासाठी संभाव्य घातक कार्डियक अॅरिथमियादरम्यान विद्युत शॉक देण्यासाठी इम्प्लांटेबल कार्डियोव्हर्टर-डिफिब्रिलेटर (आयसीडी) उपकरण वापरले जाऊ शकते.

हे एक लहान, बॅटरीवर चालणारे उपकरण आहे, जे रुग्णांच्या हृदयाचे ठोके ट्रॅक करण्यासाठी आणि अनियमितता ओळखण्यासाठी छातीवर वापरले जाते. यासह, ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्‍यक्‍तींनी रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्‍त शर्करा (ब्‍लड शुगर) आणि ईसीजी यांचा समावेश असलेली वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. अशा व्‍यक्‍तींना काही कोमोर्बिडीटीज असतील तर त्‍यांनी कोणतेही नित्‍यक्रम ठरवण्‍यापूर्वी सखोलपणे तपासणी केली पाहिजे, कारण ते घातक ठरू शकते.’’

कार्डियक अरेस्‍टनंतर देखील त्‍वरित व योग्‍य वैद्यकीय केअरसह वाचणे शक्‍य आहे. कार्डियोपल्‍मरी रिसुसिटेशन (सीपीआर), हृदयाला झटका देण्‍यासाठी डिफिब्रिलेटरचा वापर किंवा अगदी छातीवर दाब दिल्‍याने देखील वैद्यकीय मदत येईपर्यंत रूग्‍ण वाचण्‍याची शक्यता सुधारू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT