आरोग्य

महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ४ वर्षांपासून अडकला होता काचेचा तुकडा

सकाळ डिजिटल टीम

जगामध्ये कित्येक विचित्र घटना (Weird news)होत असतात ज्या ऐकून आपण थक्क होतो. सोशल मीडियावर अशा कित्येक घटनांची उल्लेख होतो. अशीच एक घटना सध्या चर्चेमध्ये आहे. आफ्रिकेतील एका देशात एका महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून शस्त्रक्रिया करून अशी वस्तू काढण्यात आली की आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.(Glass tumbler stuck in woman’s private part) तसे, महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये विचित्र गोष्टी अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही पण ही बातमी या सर्वांपेक्षा वेगळी आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, ट्युनिशियातील(Tunisia) 45 वर्षीय महिलेने नेहमी दावा केला की, तिला तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हलक्या वेदना होत होत्या आणि वारंवार लघवी करावी लागत होती. तिला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) झाल्याचे वाटले म्हणून ती तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली. परंतु तपासणीत हे सामान्य संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले. तिच्या शरीरात 8 सेमी लांबीचा मूत्राशयाचा दगड आढल्याचे पाहून डॉक्टरांना धक्का बसला.

मूत्राशयात अडकली होती काच

पण जेव्हा दगडाची खोलवर तपासणी केली आणि ऑपरेशननंतर तो बाहेर काढला तेव्हा खरी गोष्ट समोर आली आणि महिलेचे प्रकरण चर्चेत आले. ट्युनिशियातील सफोक येथील हबीब बोरगुइबा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये हे प्रकरण नोंदवले गेले. मूत्राशयामध्ये जो दगड आढळला होतो तो प्रत्यक्षात एक काचेचा तुकडा होता जो महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जाऊन मूत्राशयापर्यंत पोहोचला होता. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, काही वर्षांपूर्वी लैंगिक छळाच्या वेळी तो महिलेच्या शरीरात घुसवला गेला असावे, परंतु कोणताही निर्णायक पुरावा नाही आणि महिलेने या दाव्याची खात्री दिलेली नाही.

महिलेच्या शरीरात लाल रक्तपेशींचे प्रमाण अधिक होते

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या लघवीमध्ये लाल रक्तपेशींची श्रेणी 23-25 असते तर सामान्य व्यक्तीच्या लघवीमध्ये ती 4 किंवा त्याहून कमी असते. ओपन सर्जरी करून शरीरातून काच बाहेर काढण्यात आली होती आणि दोनच दिवसांनी महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. 2021 च्या अखेरीस ऑपरेशन झाले आणि आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचा दावा केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT