Manoj Bajpayee no dinner  sakal
आरोग्य

Manoj Bajpayee: असं कसं होऊ शकतं! गेली १४ वर्ष मनोज बाजपेयी रात्री जेवलेच नाही...वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Manoj Bajpayee Health Fact: मनोज बाजपेयीने नुकताच आपण रात्री जेवत नसल्याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, त्याने १४ वर्षांपासून रात्रीचे जेवण केले नाही.

Aishwarya Musale

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी यांची गणना बॉलिवूडमधील निवडक कलाकारांमध्ये केली जाते. मोठ्या पडद्यापासून ते ओटीटीपर्यंत त्याने आपल्या चमकदार कामगिरीची बरीच झलक दाखवली आहे. तो लवकरच 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटात दिसणार आहे. आसाराम बापूंवर आधारित हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान मनोज बाजपेयी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की तो रात्रीचे जेवण करत नाही.

गेल्या 13-14 वर्षांपासून ते हे करत आहेत. दुपारच्या जेवणानंतर त्याच्या घरी काहीही बनत नाही. त्यांनी सांगितले की जेव्हा त्यांची मुलगी हॉस्टेलमधून परत येते तेव्हाच त्यांच्या घरी रात्रीचे जेवण बनवले जाते.

मनोज बाजपेयी असे का करतो?

कुणालाही हे ऐकून आश्चर्य वाटेल की, मनोज बाजपेयी असे का करतात, त्यांच्याकडे कशाचीही कमतरता नाही, ते करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. यामागचे कारण त्यांनी सांगितले आहे. तो फिटनेससाठी हे करतो.

मनोज बाजपेयी यांनी सांगितले की त्यांचे आजोबा देखील हे करायचे आणि ते खूप फिट असायचे. त्यामुळे आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही हा निर्णय घेतला.

मग मी तसे करायला सुरू केल्यावर माझे वजन देखील नियंत्रणात राहू लागले. मला खूप बरे वाटले. खूप निरोगी वाटू लागले. मग मी ठरवले की आता मी फक्त याच गोष्टीचे पालन करणार.

मनोज बाजपेयी भूक कशी सहन करतात

मनोज बाजपेयी यांनी सांगितले की, सुरुवातीला असे करणे थोडे कठीण होते, त्यामुळे ते पाणी प्यायचे आणि हेल्दी बिस्किटे खाऊन भूक नियंत्रित ठेवत. ते म्हणतात की रात्रीचे जेवण न केल्याने त्यांच्या आरोग्याला खूप फायदा होतो आणि ही सवय कोलेस्ट्रॉल, मधुमेह यांसारख्या आजारांपासूनही दूर ठेवते.

जर आपण त्याच्या 'सिर्फ एक बंदा कोफी है' या चित्रपटाबद्दल बोललो तर, या चित्रपटात तो पी सी सोलंकी नावाच्या वकिलाची भूमिका साकारत आहे, जो आसाराम बापूला एका बलात्कार प्रकरणात शिक्षा देतो.

नुकतेच आसाराम बापू ट्रस्टनेही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट 23 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म G5 वर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT