Gut Health esakal
आरोग्य

Gut Health : निरोगी आतड्यांसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, पचनाच्या समस्या होतील दूर

Gut Health : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या सगळ्यात आतड्यांच्या ही समस्या उद्भवत आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Gut Health : सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या सगळ्यात आतड्यांच्या ही समस्या उद्भवत आहेत.

निरोगी शरीरासाठी आतड्यांचे आरोग्य देखील महत्वाचे आहे. आपल्या शरीराची पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आतडे महत्वाची भूमिका बजावतात. हे कदाचित काही लोकांना माहित नसेल. त्यामुळे, आतड्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

जर आतडी कमकुवत झाली तर आपल्या शरीराची पचनक्रिया बिघडते. मग, पोटाच्या समस्या किंवा पचनाच्या समस्या सुरू होतात. या समस्या दूर करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या आहारात फायबर्सयुक्त खाद्यपदार्थांचा जरूर समावेश करा. यामुळे, आतड्यांचे आरोग्य ही चांगले राहील आणि पचनाच्या समस्या ही दूर होण्यास मदत होईल.

आज आपण आतडे निरोगी ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचा आहारात समावेश केल्याने आतड्यांची योग्य काळजी घेतली जाईल. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

हिरव्या पालेभाज्या

आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर्स, जीवनसत्वे, खनिजे आणि पोषकघटक आढळून येतात.

हे सर्व पोषकघटक आपल्या शरीरात चांगले बॅक्टेरिआ वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे, आपल्या शरीरातील आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यामुळे, निरोगी आतड्यांसाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायला विसरू नका.

दही आणि ताकापासून बनवलेले खाद्यपदार्थ

दह्यामध्ये कॅल्शिअम, फायबर्स आणि प्रथिनांचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, दही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. पोषकघटकांनी समृद्ध असलेले दही आपल्या शरीरातील आतड्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. या दह्यातील विविध गुणधर्मांमुळे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते.

इतकचं नव्हे तर दह्यामुळे आतड्यांमध्ये होणारी जळजळ कमी होते. यासोबतच संधिवात आणि दमा सारख्या आजारांना दूर ठेवण्याचे काम दही आणि ताक करते. त्यामुळे, दह्यासोबतच ताकापासून बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा आहारात जरूर समावेश करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT