AIMS Doctor's Successfully Remove a Deadly Abdominal Tumor sakal
आरोग्य

Cancer Recovery Success Story India: ओटीपोटातील दुर्धर कर्करोगावर विजय! एम्सच्या डॉक्टरांचे मोठे यश; ४८ वर्षीय महिलेचा वाचवला जीव

48-Year-Old Woman Survives Rare Cancer after Surgery: एम्सच्या डॉक्टरांनी दुर्मिळ ओटीपोट कर्करोगावर यश मिळवत ४८ वर्षीय महिलेचे प्राण वाचवले.

सकाळ वृत्तसेवा

Successful cancer surgery at AIIMS Nagpur: नागपुरातील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थेत (एम्स) एका ४८ वर्षीय महिलेच्या ओटीपोटीतील कर्करोगांवर दुर्मिळ शस्त्रक्रिया करून या महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आहे. एम्समधील ऑन्कोलॉजी सर्जरी विभागाने ओटीपोटीतील ट्यूमर अर्थात सायटोरेडक्टिव शस्त्रक्रिया करून काढले.

त्यानंतर हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल केमोथेरपी देण्याची यशस्वी उपचार करण्यात आले. साहाय्यक प्राध्यापक डॉ. नीलेश श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

ही महिला सहा महिन्यांपूर्वी पोटदुखीच्या आजार घेऊन एम्समध्ये आली होती. यावेळी विविध चाचण्या करण्यात आल्या. महिलेस ओटीपोटीतील कर्करोग अर्थात स्यूडोमायक्सोमा पेरिटोनी, पेरिटोनियल पोकळीत पसरलेल्या म्यूसिनस ट्यूमर असल्याचे निदान झाले.

बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रिधिमा शर्मा यांच्या पथकाने इंट्राऑपरेटिव्हच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. यानंतर सर्जिकल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती बरी झाली असून नुकतेच तिला सुटी देण्यात आली. एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले. तर एम्स नागपूरमध्ये प्रगत सर्जिकल ऑन्कोलॉजी प्रक्रियेचा लाभ गरिबांना होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport : पुणे विमानतळावर 'ए-३२१' विमानांची 'भरारी'! प्रवासी क्षमता ४० ने वाढली, एका दिवसातील विक्रमी प्रवासी संख्या ३५ हजारांवर

Viral Video 'नेहा कक्करने टीशर्टवर घातली ब्रा' नेटकरी म्हणाले...'आवरा जरा हिला' व्हिडिओ चर्चेत

Latest Marathi News Live Update: : पुण्यात गाडी तोडफोड सत्र सुरूच फुरसुंगी परिसरात 15 ते 20 गाड्यांची केली तोडफोड

Car Accident: कारच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू; जबलपूर मार्गावर भीषण अपघात, कांद्रीत संतप्त नागरिकांचा रस्ता रोको

Smriti Mandhana Sangeet: तेनु लेके मैं जावांगा... स्मृती-पलाशचा रोमँटिक डान्स; तर जेमिमाहसह महिला क्रिकेटपटूंनीही धरला ठेका

SCROLL FOR NEXT