AIIMS Nagpur to Open Modern Lab Facility  sakal
आरोग्य

AIIMS Nagpur Laboratory: एम्समध्ये उभारली जाणार अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळा; नमुने पुण्याला पाठवण्याची गरज संपणार

State-of-the-Art Virus Testing Lab Coming Soon to AIIMS Nagpur: एम्स नागपूरमध्ये उभारली जाणार अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळा; पुण्याला नमुने पाठवण्याची गरज आता संपणार.

सकाळ वृत्तसेवा

AIIMS Nagpur to Open Modern Lab Facility: विदर्भात विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराच्या निदानासाठी दरवेळी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या अहवालावर अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे आजार पसरविणाऱ्या विषाणूचे निदानच वेळेवर होत नसल्याने संसर्गाची जोखीम वाढत होती. विदर्भ आणि मध्य भारतातील ही गरज लक्षात घेता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा साकारली जाणार आहे.

या करारापूर्वी अलिकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक प्रो. डॉ. अतूल गोयल, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव गुलाम मुस्तफा, नागपूर बीएसएल- ३ च्या नोडल अधिकारी डॉ. आराधना भार्गव, डिझाईन ब्यूरोचे प्रतिनिधी इम्रान खान यांनी एम्सला भेट देऊन प्रस्तावित प्रयोगशाळेच्या जागेसाठी चाचपणी देखील केली होती.

आता बीएसएल- ३ प्रयोगशाळेसाठी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राशी (एनसीडीसी) सामंजस्य करार करण्यात आला असून एम्समध्ये लवकरच अत्याधुनिक बायोसेफ्टी लेव्हल -३ (बीएसएल) प्रयोगशाळ साकारण्यात येईल.

नागपूर एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी, एनसीडीसीचे अतिरिक्त संचालक सुनील भारद्वाज यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी एम्सच्या सुक्ष्म जीवविज्ञान विभागप्रमुख डॉ. मीना मिश्रा, एनसीडीसीचे संयुक्त संचालक डॉ. अंकूर गर्ग, नागपूर बीएसएल- ३ च्या नोडल अधिकारी डॉ. भार्गव, एम्स शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. मृणाल फाटक, प्रशासकीय उपसंचालक विजयकुमार नायक, लेफ्टनंट कर्नल निखील पांडे आदी उपस्थित होते.

३० कोटींचा खर्च अपेक्षित

सुमारे ३० कोटींचा खर्च विषाणूजन्य आजाराच्या निदानासाठी निरीक्षण संस्था म्हणून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र नोडल एजंसी म्हणून काम करणार आहे. ही संस्था केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना विषाणूजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी मदत करते. एम्सने एनसीडीसीशी सामंजस्य करार केल्यानंतर एससीडीसीने बीएसएल-३ दर्जाच्या प्रयोगशाळेसाठी ३० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद राखीव ठेवली आहे. त्यातील ५ कोटी रुपये खर्चून डायग्नोस्टिक किट्स आणि उपकरणांच्या खरेदीवर खर्च होणार आहेत.

विषाणूजन्य आजाराचे होणार अचूक निदान

एम्समध्ये यापूर्वी व्हीआरडीएल प्रयोगशाळा, मंकीपॉक्सच्या निदानासाठी विभागीय निरीक्षण केंद्र, डेंग्यू- चिकुनगुण्या सोबतच सार्सच्या जिनोम फ्रिक्वेंसिंग प्रयोगशाळा देखील सुरू करण्यात आली. आता बीएसएल -३ प्रयोगशाळेमुळे बर्डफ्लू, झिका, निपाह, जापानी मेंदूज्वर, मंकिपॉक्स सोबतच प्राण्यांपासून माणसांना आणि माणसांपासून प्राण्यांना संक्रमित होणाऱ्या झुनोटिक आजाराचेही लवकर निदान होण्यास मदत मिळेल. विदर्भासोबतच आता यापुढे शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील विषाणूच्या उद्रेकाला आवर घालण्यासाठी नमुने पुण्याला पाठविण्याची गरज उरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway : पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी! नांदेड आणि हरंगुळ एक्स्प्रेस गाड्या २६ जानेवारीपासून हडपसरवरून सुटणार, पहा नवीन वेळापत्रक

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला मिळाली द्रविडची रिप्लेसमेंट! जडेजाला संघात घेतल्यानंतर जाहीर केला मोठा निर्णय

Latest Marathi Breaking News : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्चित

Mumbai Crime: अंधेरीत विद्यार्थ्याला श्वानासोबत संबंध ठेवायला भाग पाडलं, ब्लॅकमेल करत बळजबरीनं लिंगबदल करायला लावलं; तृतीयपंथीयांकडून अत्याचार

Pune Cyber Fraud : पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; पार्टटाइम जॉब आणि शेअर ट्रेडिंगच्या नावाने ९८ लाखांची फसवणूक

SCROLL FOR NEXT