Health Care esakal
आरोग्य

Health Care : हिवाळ्यातील सुपरफूड आहे हिरवे मूग, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हिरवे मूग पोषकघटकांनी परिपूर्ण आहेत.हिवाळ्यात या हिरव्या मुगाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : भारतीय लोकांच्या जेवणातील प्रमुख पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या डाळींचा आणि कडधान्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. या डाळींचा आणि कडधान्यांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

या कडधान्यांमध्ये समाविष्ट असलेले हिरवे मूग पोषकघटकांनी परिपूर्ण आहेत. हिवाळ्यात या हिरव्या मुगाचे सेवन केल्याने आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हिरव्या मुगापासून अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ देखील बनवले जातात.

या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आज आपण हिरव्या मुगाचा आहारात समावेश केल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

मूळात हिरव्या मूगाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप कमी असतो, त्यामुळे, मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हिरव्या मूगाचा आहारात समावेश करणे हे फायदेशीर ठरते. या हिरव्या मूगामध्ये आढळून येणाऱ्या कार्बोहायड्रेट्समुळे आपले अन्न सुरळीतपणे पचते.

त्यामुळे, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. परिणामी ज्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची आहे, अशा व्यक्तींनी त्यांच्या आहारात हिरव्या मूगाचा जरूर समावेश करावा.

हृदयासाठी फायदेशीर

हिरव्या मूगामध्ये फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट्सचा भरपूर समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. ज्यामुळे, हृदयविकाराचा धोका कमी होतो. शिवाय, रक्तदाब देखील सुरळीत राहतो.

ज्या लोकांना रक्तदाब किंवा हृदयविकाराची समस्या आहे, अशा लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मूगाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

प्रथिनांचा उत्तम स्त्रोत

हिरव्या मुगामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा भरपूर समावेश आढळून येतो. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून ही हिरव्या मुगाला प्रामुख्याने ओळखले जाते. वनस्पती आधारित असलेले हे हिरवे मूग आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

पेशींच्या वाढीसाठी आणि दुरूस्तीसाठी हिरवे मूग मदत करतात. यासोबतच  शरीरातील हार्मोन्सच्या निर्मितीसाठी प्रथिने अतिशय आवश्यक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT