Anger control sakal
आरोग्य

रागावरील नियंत्रण

लाव्हा उकळतो आहे. आत दबलीय निराशा, असुरक्षितता; व्यवस्थेविषयीचा, स्वत:विषयीचा राग. मग लाव्हा सारखा बाहेर येतो. क्रोधाच्या, आक्रमकतेच्या रूपात.

डॉ. विद्याधर बापट,मानसोपचारतज्ज्ञ

अरिस्टॉटल यांनी म्हटलं आहे, ‘Anybody can become angry - that is easy; but to be angry with the right person, and to the right degree, and at the right time, and for the right purpose, and in the right way - that is not within everybody’s power and is not easy.’

लाव्हा उकळतो आहे. आत दबलीय निराशा, असुरक्षितता; व्यवस्थेविषयीचा, स्वत:विषयीचा राग. मग लाव्हा सारखा बाहेर येतो. क्रोधाच्या, आक्रमकतेच्या रूपात. तेल ओतायला आजूबाजूला सवंग करमणूक आहेच.  विविध माध्यमांद्वारे सहज उपलब्ध असलेली,  लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारी सवंग करमणूक आणि त्या भावनेचं शमन होण्यासाठी चुकीचे मार्ग, काहींच्या बाबतीत त्या भावना दाबाव्या लागणं, सुख मिळवण्याच्या चुकीच्या कल्पना. स्पर्धात्मक वातावरणाचा ताण आहेच.

मग शिक्षण असो, नोकरी असो वा व्यवसाय असो. ‘अपेक्षेप्रमाणेच सगळं मला मिळायला हवं आणि तेही ताबडतोब. खरं सुख भौतिक सुखातच आहे. मी ते मिळवीनच. दिलं तर सरळ, नाहीतर ओरबाडून. त्यासाठी मी आक्रमक व्हायलाच हवं. इतरांनी माझ्या मनासारखं वागायलाच हवं,’ अशी मानसिकता आज दुर्दैवानं अनेक तरुणांची झाली आहे. क्रोधातून काहीजणांच्या हातून घडणारे गुन्हेही वाढले आहेत.

सगळ्यांच्याच हातून टोकाच्या गोष्टी घडताहेत असं नाही; पण एकूणच युवावर्गात राग अति येण्याचं आणि तो चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरिक सुखाची व्याख्या चुकतेय. आनंद आणि मन:शांतीसाठी रागासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं हे म्हणूनच समजून घ्यायला हवं. रागासारख्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवला, तर तरुणांच्या हातून सृजन घडेल, समाजस्वास्थ्य वाढेल.

‘राग’ ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. बहुतेक वेळा ती,  अपेक्षाभंग, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, नैराश्य्य, मनाविरुद्ध वागणारी माणसं वगैरेबद्दलची आपल्याकडून व्यक्त होणारी सहज बचावात्मक प्रतिक्रिया (Defence Mechanism) असते. राग संयमितरीत्या, योग्य वेळी, योग्य प्रमाणात, शांतपणे व्यक्त करता येत नसेल, तर त्याचे परिणाम स्वतःसाठी अत्यंत घातक होऊ शकतात.

शारीरिक परिणाम : रक्तदाब वाढणं, नाडीची गती अनियंत्रित होणं, हृदयावर अनिष्ट परिणाम (कारण भावना व हृदय ह्यांचा थेट संबंध आहे), निद्रानाश, डोकेदुखी, पित्त व पचनाच्या तक्रारी,अतिरिक्त प्रमाणात हानिकारक संप्रेरकं स्रवणं इत्यादी. मानसिक परिणाम : स्मृतिभ्रंश, विचारांचा गोंधळ, आत्मविश्वास व एकाग्रता कमी होणं, नैराश्याच्या आजाराकडे वाटचाल.

गौतम बुद्धांनी म्हटलं आहे, की व्यक्त न झालेला क्रोध हा हातात घेतलेल्या जळत्या निखाऱ्यासारखा असतो. तो फेकून दिला नाही, तर स्वतःचाच हात भाजतो. क्रोधाच्या भावनेला ventilation मिळायला हवं; पण योग्य रीतीनं. राग बहुदा दोन प्रकारे हाताळला जातो. दाबून ठेवून किंवा एकदम जागच्या जागी त्याक्षणी जोरदारपणे व्यक्त करून. दोन्ही पद्धती चुकीच्या, घातक आहेत.

मग योग्य पद्धत कुठली? तर, राग येईल त्या क्षणी शांत राहून, घडलेल्या घटनेचा विचार करून कालांतराने शांतपणे, योग्य सुसंस्कृत प्रकारे त्या व्यक्तीला आपला विचार, भावना सांगणं. हे प्रत्यक्षात जमवायचं कसं? त्यासाठी एकूणच राग येण्याची प्रक्रिया समजून घ्यायला हवी. त्याच्या मुळापर्यंत जायला हवं. आवश्यक तर तज्ज्ञांचं साह्य घ्यायला हवं; पण रागावर नियंत्रण ठेवणं शिकायलाच हवं. 

रागनियंत्रणासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • माझ्या भावनांवर माझा पूर्ण ताबा असायला हवा.  हे घडू शकतं यावर विश्वास हवा. माझ्यात बदल घडायला हवा ही अत्यंत प्रामाणिक इच्छा हवी.

  • आयुष्यामध्ये अनेक गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडणार आहेत आणि त्या मी स्वीकारायला हव्यात.

  • मी परिपूर्ण नाही. माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. तशाच चुका इतरांकडूनही होऊ शकतात आणि त्याबद्दल त्यांना क्षमा करायला हवी. 

  • माझ्या भावना मी शांतपणे, न चिडता; पण ठामपणे व्यक्त केल्या, तर माझं परिस्थितीवर नियंत्रण राहू शकतं आणि परिणाम मला हवा तो होऊ शकतो. यानं माझं मन:स्वास्थ्य टिकू शकतं आणि क्रोधामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टळू शकतात.

  • आक्रस्ताळेपणा किंवा हिंसेची इच्छा म्हणजे पौरुषत्व नव्हे.

रागाबाबतचे इतर मुद्दे आणि त्याचं व्यवस्थापन यांच्याविषयी पुढील भागात विचार करू.

(क्रमशः)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT