Anxiety Disorders  esakal
आरोग्य

Anxiety Disorders : एंझायटीने ४ कोटी लोक त्रस्त, चिंता करण्याऐवजी 'अशी' घ्या काळजी

समस्येची सुरूवात गंभीर वाटत नसली तरी यावर वेळीच उपाय करण आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

सकाळ डिजिटल टीम

Anxiety disorders Sollution Tips : माणसांना वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या चिंता सतत असतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे. समस्येची सुरूवात गंभीर वाटत नसली तरी यावर वेळीच उपाय करण आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

अशावेळी आपण आपल्या पातळीवर हे ताण, चिंता दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी सर्वात आधी यामुळे त्रासून जाण्याऐवजी त्याचा स्वीकार करून उपाय योजावे. यावर प्रभावी उपाय म्हणजे आपली श्वस घेण्याची पध्दत आणि त्यावर नियंत्रण हे आहे.

भारतीय योग पध्दतीचं महत्व परदेशातही पटलं आहे. श्वास घेणं आणि सोडणं या व्यतिरीक्त श्वास धरून ठेवणं (कुंभक) यालाही महत्व आहे.

Anxiety Disorders

कसा करावा हा प्रणायाम?

  • एक मोठा श्वास घ्यावा. नंतर हाताने नाक बंद करत ५ सेकंद श्वास आत धरून ठेवायचा मग सोडावा.

  • नंतर पुन्हा श्वास घ्या, ३ सेकंद कुंभक करा मग ६ सेकंदात हळू हळू सोडा.

  • असं दिवसातून ३ वेळा करावं.

Anxiety Disorders

याचे फायदे

  • शरीरातला कार्बन डायऑक्साईड योग्य पध्दतीने बाहेर पडतो.

  • शरीराला आराम मिळतो.

  • छातीचे ठोके संथ गतीने चालण्याचा मेंदू कडून हृदयाला संदेश दिला जातो.

डोळ्यांचा आणि मोनेचा व्यायाम

मांडी घालून ताठ बसावं. डोकं हलवल्याशिवाय फक्त डोळ्यांनी डावीकडे, उजवीकडे बघावं. मग डोकं त्या दिनेशे झुकवत ३० ते ६० सेकंद त्याच स्थितीत रहावं. मग दुसऱ्या बाजूने तसंच करावं.

५-५-५ फॉर्मुल्याने कमी होतो ताण

आजूबाजूला दिसणाऱ्या ५ गोष्टींचे नाव आठवा. मग आजूबाजूला होत असलेले ५ आवाजांना लक्षपूर्वक ऐका. शरीराचे पाच अवयव किंवा भाग हलवा. उदा. हात मनगटातून फिरवा. मान खालीवर करा. कान पिरगळा अशा हालचालींनी शरीराला आमि मनाला आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

Latest Marathi News Live Update : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; 16 हजार 717 पदांसाठी होणार भरती

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

SCROLL FOR NEXT