Sore Throat sakal
आरोग्य

Sore Throat: घसादुखीवर हे घरगुती उपाय करा ट्राय; लवकरच मिळेल आराम

काही काही घरगुती उपायांच्या मदतीने देखील तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता.

Aishwarya Musale

आपल्या घशावर बदलत्या हवामानाचा परिणाम होतो, ज्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा घसा खवखवतो तेव्हा बोलणे आणि खाणे या दोन्ही समस्या येतात.

ही अशी समस्या आहे ज्यापासून सुटका होण्यासाठी तुम्हाला अनेक दिवस लागू शकतात, त्यामुळे तुमच्या अनेक कामांवर परिणाम होऊ शकतो, परंतु तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, काही घरगुती उपायांनी तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

घसादुखीसाठी गार्गल करा

1. हळद, मीठ आणि पाणी

हळद हा एक असा मसाला आहे ज्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, तर मीठामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत जे बॅक्टेरियांवर जोरदार हल्ला करतात आणि त्यात असलेले दाहक-विरोधी घटक घशातील सूज आणि खवखवणे दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे हळद, मीठ आणि पाण्याच्या साहाय्याने गार्गल करावे.

2. त्रिफळा आणि पाणी

त्रिफळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, म्हणूनच त्रिफळा आणि पाण्याने गार्गल केल्याले घसादुखीपासून लवकर आराम मिळतो. तसेच, टॉन्सिलिटिसमुळे वेदना होत असल्यास, तरीही ते औषधासारखे काम करेल.

3. तुळस आणि पाणी

तुळशीचे रोप बहुतेक भारतीय घरांमध्ये लावले जाते, ते औषधापेक्षा कमी नाही, कोमट पाण्यात तुळशीची पाने टाकून गुळण्या केल्यास, घसादुखीपासून लवकर आराम मिळेल. या वनस्पतीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे घशासाठी फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha reservation Protest : ऐन गणेशोत्सवात मुंबईत मराठ्यांचा एल्गार; राजधानीत धडाडणार जरांगेंची तोफ, कधी निघणार मोर्चा?

Lalbaugcha Raja : 'लालबाग राजा'च्या दर्शनासाठी सकाळपासूनच मुंबईत तुफान गर्दी; 1 कोटीहून अधिक लोक येण्याची शक्यता, कशी आहे सुरक्षा व्यवस्था?

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षणासाठी 'वारणा'पट्ट्यातून मोठी कूच; २९ ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन

Vaishno Devi Landslide: वैष्णोदेवी यात्रा मार्गावर भूस्खलन, ३0 जणांचा मृत्यू; जम्मूत आजही ढगफुटीचा धोका

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT