Hydration Therapy  esakal
आरोग्य

Hydration Therapy : अर्जुन कपूरने घेतलेली हायड्रेशन थेरपी नेमकी काय आहे? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Hydration Therapy : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने नुकतीच हायड्रेशन थेरपी घेतली आहे. ही थेरपी नेमकी काय आहे?

Monika Lonkar –Kumbhar

Hydration Therapy : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या अभिनयासाठी आणि उत्तम फिटनेससाठी खास ओळखला जातो. तो सोशल मीडियावर ही चांगलाच अ‍ॅक्टिव्ह असतो. नुकतेच अर्जुनने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तो बेडवर झोपला असून त्याच्या हाताला ड्रिप लावलेले दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी घाबरून त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

लोकांना असे वाटले की, अर्जुन आजारा पडलाय. परंतु, असे काही ही नाहीये. खर तर अर्जुनने नुकतीच हायड्रेशन थेरपी घेतली आहे. ही थेरपी नेमकी काय आहे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात? ते आपण जाणून घेणार आहोत.

हायड्रेशन थेरपी काय आहे?

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने घेतलेली हायड्रेशन थेरपी ही एक प्रकारची व्हिटॅमिन थेरपी आहे. या थेरपीला इंट्राव्हीनस मायक्रोन्यूट्रिएंट किंवा हायड्रेशन थेरपी असे ही म्हटले जाते. या थेरपीमध्ये ड्रिपद्वारे तुमच्या शरीरात हाय कंन्सट्रेशन आणि उच्च क्षमता असलेली खनिजे सोडली जातात. अर्जुन कपूरच्या आधी हॉलिवूड स्टार केंडल जेनर, हेली बीबर इत्यादी सेलिब्रिटींनी ही थेरपी घेतली आहे.

हायड्रेशन थेरपीची किंमत किती?

या हायड्रेशन थेरपीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास या थेरपीची किंमत $200 ते $400 डॉलर म्हणजेच तब्बल २५-३० हजार रूपये आहे. या थरेपीद्वारे व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि खनिजांचा डोस जास्त प्रमाणात दिला जातो.

हायड्रेशन थेरपीचे आरोग्याला होणारे फायदे कोणते?

हायड्रेशन थेरपीच्या फायद्यांबद्दल सांगायचे झाल्यास, काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते पचन आणि श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही हायड्रेशन थेरपी अतिशय फायदेशीर आहे.

तसेच, IV फ्लूएड आपल्या पचनसंस्थेला बायपास करतात आणि थेट रक्तप्रवाहात शोषले जाते. इतकेच नव्हे तर या थेरपीद्वारे लठ्ठपणावर ही मात केली जाऊ शकते आणि शरीरातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता दूर केली जाऊ शकते. विशेष म्हणजे ही थेरपी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करते आणि वृद्धत्व कमी करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT