Arthritis google
आरोग्य

Arthritis : मान, कंंबर, खांदे, गुडघे यांतील वेदनेमुळे येऊ शकतो heart attack

यूरिक ऍसिडचे हे क्रिस्टल्स हृदय आणि मेंदूला होणार रक्तपुरवठा रोखतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात देखील होऊ शकतो.

नमिता धुरी

मुंबई : मानवी शरीर हे एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. जगातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ मानवी शरीरावर किंवा त्याच्याशी संबंधित आजारांवर अभ्यास करत राहतात आणि प्रत्येक संशोधनातून नवीन माहिती समोर येते. आता नॉटिंगहॅम आणि कीले युनिव्हर्सिटीचे नवीन संशोधन घ्या, या अभ्यासात असे समोर आले आहे की मान, कंबर, खांदा आणि गुडघ्याच्या सांध्यातील वेदना यांमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.

एवढेच नाही तर गाउटमुळे केवळ हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन हॅमरेजच नाही तर काही वेळा फुफ्फुसात संसर्ग होण्याची भीतीही असते, असेही या अहवालात आढळून आले आहे. गाउट रोगाचा हृदय-मेंदू आणि फुफ्फुसांवर कसा परिणाम होतो. हे जाणून घेण्यासाठी आधी संधिवात कसा होतो ते समजून घ्या.

गाउट होण्याचे मुख्य कारण म्हणजे यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे. कारण वाढलेले युरिक अॅसिड क्रिस्टल्स तयार होऊन सांध्यांमध्ये जमा होऊ लागतात. त्यामुळे सांधे जाम होतात आणि सूज येऊन वेदना वाढू लागतात.

अलीकडील संशोधनानुसार, यूरिक ऍसिडचे हे क्रिस्टल्स हृदय आणि मेंदूला होणार रक्तपुरवठा रोखतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात देखील होऊ शकतो.

सांधेदुखीच्या रुग्णांनी या ऋतूत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात वातदोष वाढतो ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो आणि उठणे-बसणे कठीण होते. म्हणजेच, सांधेदुखीने बळी पडलेल्या देशातील १८ कोटींहून अधिक लोकांसाठी हा सुखद पावसाळा सध्या आपत्ती आहे.

संधिवात कसा होतो ?

युरिक ऍसिड वाढल्यामुळे त्याचे रुपांतर क्रिस्टल्समध्ये होते. सांंध्यांमध्ये क्रिस्टल्स जमा होतात. सांधे कडक होऊ लागतात.

संधिवाताची कारणे

वाईट जीवनशैली, चुकीचे खाणे, वाढलेले वजन, खनिजांची कमतरता, व्हिटॅमिनची कमतरता, हार्मोन्स असंतुलन, इत्यादी

संधिवात लक्षणे काय आहेत ?

सांधेदुखी-क्लॅम्प, गुडघ्यांमध्ये सूज येणे, मोडलेली हाडे, त्वचा लाल होणे.

हाडे कशी मजबूत होतात ?

आहारात कॅल्शियम वाढवा. १ कप दूध प्या. सफरचंद सायडर व्हिनेगर प्या. कोमट पाण्यातून दालचिनी-मध प्या. सांधेदुखीत आराम मिळेल. कोमट मोहरीच्या तेलाची मालिश करा. वेदनांवर उबदार पट्टी लावा. कोमट पाणी आणि रॉक मीठ मिसळून कॉम्प्रेस बनवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft AI Policy : ६० हजार कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव, त्यातच मायक्रोसॉफ्टच्या धोरणांवर टीका; एआयमुळे नोकरी जाण्याच्या भीतीने कर्मचारी त्रस्त?

Flight Hijack Scare : विमानाचे उड्डाण होणार इतक्यात टॉयलेटच्या आरशावर दिसला 'तो' मेसेज; १०५ प्रवाशांचा जीव टांगणीला!

Latest Marathi News Live Update : वाशिम जिनिंगमध्ये उघड्यावर साठवून ठेवलेल्या दहा हजार क्विंटल कापसाला आग

China Economic Crisis : चीनच्या अर्थव्यवस्थेची दोन टोके; तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती, मात्र बेरोजगारी आणि घसरत्या गुंतवणुकीमुळे आर्थिक आव्हाने कायम

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा CRPF चौकीवर गोळीबार; तीन जवान जखमी

SCROLL FOR NEXT