winter health sakal
आरोग्य

हिवाळा आणि आरोग्य

संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा.

सकाळ वृत्तसेवा

संपूर्ण वर्षभरात सर्वांत चांगला ऋतू कोणता, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे साधे-सरळ उत्तर म्हणजे हिवाळा. विसर्गकाळातील शिशिर व हेमंत ऋतू म्हणजेच हिवाळा हा पुढच्या संपूर्ण वर्षातील आरोग्याची पायाभरणी करणारा असतो असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

मात्र, ही पायाभरणी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे भाग असते. आहार, व्यायाम, उपचार अशा प्रकारे तिन्ही बाजूंनी हिवाळ्यात आवश्‍यक ते बदल केले, तर हिवाळ्याचा आनंदही घेता येई, शिवाय पुढचे संपूर्ण वर्ष आरोग्यपूर्ण जावे यासाठी तयारी होऊन राहील.

हिवाळ्यामध्ये शरीरस्थ अग्नीला निसर्गतः शक्ती मिळत असते. म्हणून हिवाळ्यात भूक चांगली लागते, पचन व्यवस्थित होते, असा सर्वांचा अनुभव असतो. म्हणून अष्टांगहृदयात वाग्भटाचार्य म्हणतात, अतो हिमेऽस्मिन्‌ सेवेत स्वाद्वम्ललवणान्‌ रसान्‌ । ...वाग्भट

म्हणजे या ऋतूत गोड, आंबट व खारट चवीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा. त्यातही मधुर रस (गोड चव) शरीराचे पोषण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ असल्याने विशेषतः गोड गोष्टी या ऋतूत खाव्यात. योग्य अशा स्निग्ध पदार्थांचे सेवन करावे. यादृष्टीने अधिक विस्तारपूर्वक सांगायचे तर दूध तसेच दुधाचे पदार्थ म्हणजे लोणी, तूप, ताक, अधूनमधून मलई, दही, खरवस, चीज वगैरे खाता येतात.

मुख्य जेवणात धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यापासून तयार केलेले विविध प्रकार, डाळी व कडधान्यांपैकी मूग, तूर तर उत्तमच, परंतु हेमंत ऋतूत मसूर, मटकी व प्रकृतीला अनुकूल असल्यास हरभरा, उडीद, चवळी ही कडधान्येही खाता येतात.

भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, दोडका, घोसाळी, पडवळ, बटाटा, टिंडा, भेंडी, पालक, मेथी या भाज्या नित्य वापरण्यास योग्य, तर वांगे, सिमला मिरची, घेवडा, वालाच्या शेंगा या भाज्या अधूनमधून खाता येतात. आमटी, भाजी वगैरे बनविताना जिरे, हिंग, धणे, मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र, वेलची, हळद, कोकम, आले, लसूण अशा मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर करता येतो.

काकडी, टोमॅटो, गाजर, बीट यांची दही घालून कोशिंबीर करता येते, चवीसाठी ताजी हिरवी चटणी, लोणचे, पापड खाता येतात, ऋतूनुसार बाजारात मिळणारी उत्तम फळे, सुक्या मेव्यापैकी बदाम, खजूर, खारीक, काजू, अंजीर, मनुका, जर्दाळू, अक्रोड उचित प्रमाणात खाता येतात. लाडू, बर्फी, खीर, खोबऱ्याची वडी, डिंकाचा लाडू, दुधी हलवा, साखर-केशरी भात असे गोड पदार्थ खाण्यात ठेवता येतात.

यालाच जोड म्हणून या दिवसात आयुर्वेदिक रसायनांचे सेवन केले तर ते आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम असते. तसे पाहता रसायन पूर्ण वर्षभर खाणे उत्तमच असते, पण पचनशक्ती उत्तम असलेल्या कालावधीत रसायन सेवनाचा सर्वोत्कृष्ट उपयोग होत असल्याने हिवाळ्यात रसायन सेवन करणे श्रेयस्कर होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, सॅन रोझ, मॅरोसॅन, संतुलन चैतन्य कल्प, शतावरी कल्प यासारखी रसायने हिवाळ्यात अवश्‍य सेवन करावीत अशी होत.

हिवाळ्यात त्वचेची काळजीसुद्धा विशेषत्वाने घ्यावी लागते. कारण थंड व कोरड्या हवेमुळे त्वचासुद्धा कोरडी रखरखीत होत असते. सुरुवातीपासून नीट काळजी घेतल्यास त्वचा निरोगी ठेवता येऊ शकते. थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे अभ्यंग.

रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे वेळ काढून संपूर्ण अंगाला अभ्यंग तेलासारखे त्वचेला स्निग्धता देणारे, शिवाय त्वचेमार्फत आत जिरून रस, रक्त, मांस या धातूंपर्यंत काम करणारे तेल लावले तर त्वचेला आतून-बाहेरून आवश्‍यक ते सर्व पोषण मिळते, नियमित अभ्यंगाइतकाच दुसरा प्रभावी उपाय म्हणजे उटण्याचा वापर.

उटण्यामध्ये अनंतमूळ, ज्येष्ठमध, वाळा, हळद, दारुहळद अशा अनेक उत्तमोत्तम वनस्पतींचे मिश्रण असते, ज्या त्वचेला स्वच्छ तर करतातच, पण त्वचेवरील दोष दूर करण्यासही समर्थ असतात. उटण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामुळे त्वचेला उचित स्निग्धता मिळते, वातावरणातील कोरडेपणामुळे त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. सॅन मसाज पावडरसारखे उटणे या दृष्टीने उत्तम होय.

हिवाळ्यात उटणे लावताना किंवा मुखलेप लावताना त्यात पाण्याऐवजी दूध-दुधाची साय टाकण्याचा अधिक उपयोग होऊ शकतो. अभ्यंग, उटणे, या प्रकारचे विशेष लेप यांची व्यवस्थित योजना केली तर हिवाळ्याचा दुष्परिणाम त्वचेला भोगावा लागणार नाही हे निश्र्चित. हिवाळ्यामध्ये तळपाय विशेषतः टाचांना भेगा पडणे, शरीरात अतिरुक्षता वाढल्याने भेगांमधून रक्त येणे या सुद्धा तक्रारी आढळतात.

यावर नियमित पादाभ्यंग उत्तम असतो. त्यातही पादाभ्यंगासाठी शतधौतघृत किंवा औषधांनी युक्त संतुलन पादाभ्यंग घृतासारखे शतधौत घृत वापरण्याचा अजून चांगला गुण येताना दिसतो. हिवाळ्याचा परिणाम ओठांवरही होतो. ओठ फुटणे, दोन ओठ कडेला मिळतात त्या ठिकाणी बारीकशी चीर जाणे असे त्रास हिवाळ्यात होताना दिसतात. ओठ फुटू नये यासाठी ओठांवर दुधावरची साय लावणे उत्तम असते.

ओठांच्या कडेला चीर पडणे हा प्रकार खूप वेदनामय असू शकतो. बोलताना, खाता-पिताना ओठाची हालचाल झाली की त्या ठिकाणी वेदना होतात. यावर घरचे ताजे लोणी किंवा घरचे साजूक तूप लावून ठेवण्याचा फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर २-३ थेंब तूप लावण्यानेही ओठांना चीर जाण्याची प्रवृत्ती कमी होते असा अनुभव आहे.

एकंदर त्वचा कोरडी झाली तर त्याचा परिणाम गुदाच्या आसपासच्या त्वचेवरही होतो. विशेषतः फिशर म्हणजे गुदाला भेगा पडून शौचाच्या वेळेला आग होणे, वेदना होणे या प्रकारचा त्रास होऊ शकतो. यावर गुदभागी व्रणरोपण तेल किंवा सॅन हील मलमसारखे औषधी तुपापासून बनविलेले मलम लावण्याचा उपयोग होतो. हिवाळ्याची सुरुवात झाल्यावर लगेचच रोज रात्री झोपण्यापू्‌‌र्वी गुदभागी दोन थेंब एरंडेल तेल लावण्यानेही या प्रकारचा त्रास होण्यास प्रतिबंध होतो.

सर्व रसायनगुणांनी परिपूर्ण असा जो आवळा, तोसुद्धा हिवाळ्यात मिळतो हा केवळ योगायोग नाही. आवळ्याप्रमाणे रसायनगुणांनी परिपूर्ण असे इतरही अनेक कंद या ऋतूत तयार होतात. अशा सर्व द्रव्यांपासून बनविलेला च्यवनप्राश, धात्री रसायन, संतुलन आत्मप्राश, संतुलन सुहृदप्राश, मॅरोसॅन वगैरे रसायने घेणे, कमीत कमी घरच्या घरी डिंकाचे लाडू, पंचामृत तयार करून घेणे हे हिवाळ्यात उत्तम असते.

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT