Sound Pollution esakal
आरोग्य

हाक वसुंधरेची : आवाजाची पातळी

बालमित्रांनो कालच्या भागात आपण ध्वनिप्रदूषणाची माहिती घेतली. आपण आज आवाजाची पातळी म्हणजे काय हे पाहणार आहोत.

सकाळ वृत्तसेवा

बालमित्रांनो कालच्या भागात आपण ध्वनिप्रदूषणाची माहिती घेतली. आपण आज आवाजाची पातळी म्हणजे काय हे पाहणार आहोत.

- अशोक तातुगडे

बालमित्रांनो कालच्या भागात आपण ध्वनिप्रदूषणाची माहिती घेतली. आपण आज आवाजाची पातळी म्हणजे काय हे पाहणार आहोत.

आवाजाची पातळी डेसिबल या एककामध्ये मोजतात. या निर्देशित सुरक्षित पातळ्या अशा आहेत..

  • औद्योगिक क्षेत्र - ७०-७५

  • व्यावसायिक क्षेत्र - ५५-६५

  • निवासी क्षेत्र - ४५-५५

  • शांतता क्षेत्र ( हॉस्पिटल शाळा आदी) - ४०-५०

या पातळ्यांवरील आवाज धोकादायक आहेत. काही धोकादायक आवाज असे आहेत. लाउड स्पीकर १२० डेसिबल, जेट विमान १४० डेसिबल, अग्निबाण सोडतानाचा आवाज १८० डेसिबल. आवाजाच्या ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या उद्‍भवतात. हे आता संशोधनाने सिद्ध झाले आहे. व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होणे, रात्री झोप न लागणे, डोकेदुखीची व्यथा उत्पन्न होणे, मनोबलावर परिणाम होणे, निराशा वाटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, या बरोबरच रक्तदाब वाढणे, हृदयरोग निर्माण होणे, कामातील कार्यक्षमता कमी होणे या दुष्परिणांची नोंद झालेली आहे.

आता आपण ध्वनी प्रदूषणाचे स्रोत कुठले आहेत ते पाहू या...

1) नैसर्गिक स्रोत - ढगांचा गडगडाट, वादळ, भूकंप, विजांचा कडकडाट आदी यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. परंतु अशावेळी शक्यतो कानावर हात ठेवून किंवा त्या आवाजापासून सुरक्षित वाटेल अशा ठिकाणी, म्हणजेच बंद खोलीत जाऊन आपण त्रास काही प्रमाणात नियंत्रित करू शकतो.

2) मानवनिर्मित स्रोत - कारखान्यातील मशिन्स, स्वयंचलित वाहने व त्यांचे विनाकारण वाजवलेले हॉर्न, मनोरंजनाचे साधने, लाऊड स्पीकर्स डीजे आदी. पुढील भागात ध्वनी प्रदूषण टाळण्याचे काही उपाय पाहूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT