Food diet sakal
आरोग्य

आहार‘मूल्य’ : व्यायामाआधीचे खाणे आणि त्याचे महत्त्व

व्यायाम करण्यासाठी ताकदीची गरज असते. आपण जेव्हा अन्यपदार्थाचे सेवन करतो, तेव्हा त्यापासून उष्मांक मिळतात आणि त्या उष्मांकापासून मिळालेल्या ऊर्जेमुळे आपल्याला विविध गोष्टी करता येतात.

सकाळ वृत्तसेवा

व्यायाम करण्यासाठी ताकदीची गरज असते. आपण जेव्हा अन्यपदार्थाचे सेवन करतो, तेव्हा त्यापासून उष्मांक मिळतात आणि त्या उष्मांकापासून मिळालेल्या ऊर्जेमुळे आपल्याला विविध गोष्टी करता येतात.

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

व्यायाम करण्यासाठी ताकदीची गरज असते. आपण जेव्हा अन्यपदार्थाचे सेवन करतो, तेव्हा त्यापासून उष्मांक मिळतात आणि त्या उष्मांकापासून मिळालेल्या ऊर्जेमुळे आपल्याला विविध गोष्टी करता येतात. लोक विविध प्रकारचे व्यायाम करत असतात. त्या व्यायामांच्या दरम्यान ऊर्जा मिळत राहावी व चांगल्या प्रकारचा व्यायाम व्हावा यासाठी प्री-वर्कआऊट मिल म्हणजेच व्यायामाच्या आधीचे खाणे याला महत्त्व आहे.

प्री-वर्कआऊट मिलचे महत्त्व

  • व्यायामाच्या दरम्यान पुरेशी एनर्जी मिळण्यासाठी

  • साठलेल्या चरबीचा उपयोग करून घेण्यासाठी

  • रक्तातल्या साखरेला नियंत्रित ठेवण्यासाठी

  • योग्य प्रमाणात खाणे केले नाही, तर व्यायामाच्या दरम्यान येऊ शकणारा आळस टाळण्यासाठी

  • डिहायड्रेशन टाळून इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन राखण्यासाठी

प्री-वर्कआऊट मिलमध्ये

  • कर्बोदके व प्रथिने यांचे योग्य प्रमाण असावे.

  • तेलकट चरबीयुक्त पदार्थांमुळे पचनक्रियेचा वेग मंदावतो, म्हणून असे पदार्थ टाळावेत.

  • किमान एक ते दीड तास आधी खाणे महत्त्वाचे.

  • स्ट्रेंथ ट्रेनिंगसारख्या व्यायामात प्रथिनांची गरज जास्त असते, त्यामुळे चांगली शोषली जाणारी प्रथिने निवडणे आवश्यक.

  • पाणी व इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यासाठी.

प्री-वर्कआऊट मिल म्हणून काय खावे?

१) कर्बोदके शरीराला ऊर्जा देतातच; पण आहारातील प्रथिने स्नायूपर्यंत पोचवण्यासाठी ही मदत करतात. म्हणून वर्कआऊटच्या आधी फळांचा आहारात समावेश करावा. उदाहरणार्थ-केळी. यात कर्बोदकांबरोबरच पोटॅशियम मिळते. व्यायामासाठी मदतरूप असते.

२) ड्रायफ्रूट्स : यामध्ये असणारे हेल्दी फॅट, फायबर व प्रथिने हे व्यायामादरम्यान ऊर्जेची पातळी वाढविण्यासाठी मदत करतात.

३) दही किंवा योगर्ट : प्रथिने व प्री-डायजेस्टेड कर्बोदके मिळतात.

४) दूध : सायविरहित दूध, किंवा बदामाचे, सोयाबिनचे दूध आवश्यक अशी प्रथिने देतात.

५) चपाती/ ब्रेड : कॉमब्लेड कर्बोदक मिळण्यासाठी

६) रताळे/ बटाटा : रताळे किंवा बटाटा उकडून खाल्ल्यास उष्मांक मिळतात; कर्बोदके व चोथा मिळण्यास मदत होते.

७) पनीर/चिकन : या पदार्थापासून प्रथिने मिळतात.

८) ओट्स/ विविध लाह्या : पचनासाठी सुलभ, उष्मांक व चोथा देतील.

९) चिया सीड्स : प्रथिने व हेल्दी फॅट देतात.

१०) बेरी, हिरव्या पालेभाज्या, फळे, नट्स यांचा वापर करून स्मूदी. यापासून अँन्टीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, फायबर मिळण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT