Food Sakal
आरोग्य

आहार‘मूल्य’ : आहार आणि केसांचे आरोग्य

आपले केस, दाट, चमकदार असावेत, असे प्रत्येकाला वाटत असते.

सकाळ वृत्तसेवा

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

आपले केस, दाट, चमकदार असावेत, असे प्रत्येकाला वाटत असते. योग्य निगा न राखल्याने केसांचे आरोग्य ढासळते. त्यामागील महत्त्वाची कारणे

१) हवामानाचा परिणाम

२) केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर

३) निरोगी झोपेचा अभाव

४) कुपोषित आहार

५) धूम्रपान व मद्यपान

६) ताण-तणाव

आहारामध्ये बदल करून पोषणयुक्त आहाराचे नियोजन केल्यास केसांचे आरोग्य वाढीस लागते. आहारातील खालील नऊ पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी मदतरूप ठरतात.

अंडी : उत्तम प्रकारचे प्रथिने उपलब्ध असते व त्यात बायोटिन नावाचा घटक असतो, त्यामुळे केसांचे आरोग्य उत्तम प्रकारे राखले जाते.

हिरव्या पालेभाज्या : जीवनसत्त्व व लोहयुक्त पालेभाज्या शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात व ऑक्सिजन व जीवनसत्त्व केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी : ही फळे ‘क’ जीवनसत्त्वयुक्त असतात व ‘क’ जीवनसत्त्वामुळे लोहाचे शोषण चांगले होण्यास मदत होते व केसांचे आरोग्य टिकते.

बदाम, अक्रोड : या सुकामेव्यामध्ये ओमेगा थ्री फॅट असते व त्यामुळे आपले केस दाट व मजबूत होण्यास मदत होते.

दही : दही हे उत्तम प्रोबायोटिक आहे. त्यामध्ये जीवनसत्त्व बी, ई हे असते. त्यापासून मिळणारे प्रथिन उत्तम प्रकारे शोषले जाते व केसांच्या वाढीसाठी मदतरूप आहे.

नारळ/ खोबरे : नारळामध्ये असणारे तेल जीवनसत्त्व ई व क्षारयुक्त असते. केस घनदाट व चमकदार होतात.

पाणी : हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे गळती होते. त्यामुळे त्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे.

भोपळ्याच्या बिया व सूर्यफूल बिया : यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम यांसारखे क्षार आहेत- जे अॅन्टीऑक्सिडंट म्हणून काम करतात व त्याच्यापासून आवश्यक असे फॅट व प्रथिने मिळतात- ज्यामुळे केसांचे पोषण होते.

जवस, चिया सीड्स : या सीड्समध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड व प्रथिने असतात- जी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.

केसांच्या उत्तम आरोग्यासाठी

१) आहारात तेलयुक्त, मीठयुक्त पदार्थांचा वापर टाळावा.

२) एक कप लिंबूपाणी मीठ व साखर न घालता दिवसभरात घ्यावे.

३) आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये यांचा वापर वाढवावा.

४) पुरेशी झोप व नियमित व्यायाम.

५) अंडी, मासे, बदाम, अक्रोड, दही, टोफू, दही यांसारख्या पदार्थांचा वापर करावा.

६) नियमीत पाणी प्यावे. अतिरिक्त चहा-कॉफी, मद्यपान टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT