Diet Sakal
आरोग्य

आहार‘मूल्य’ : डाळी, उसळी आणि पोषणमूल्ये

शरीराच्या निकोप वाढीसाठी, झीज भरून येण्यासाठी प्रथिनांची गरज असते. प्रथिनं ही वनस्पतीजन्य व प्राणीज अशी दोन्ही प्रकारची असतात.

सकाळ वृत्तसेवा

- अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागार

शरीराच्या निकोप वाढीसाठी, झीज भरून येण्यासाठी प्रथिनांची गरज असते. प्रथिनं ही वनस्पतीजन्य व प्राणीज अशी दोन्ही प्रकारची असतात. डाळी आणि कडधान्यं, उसळी हे चवदार, पोषणमूल्यं असणारे प्रथिनांचे प्रकार आहेत.

पोषक डाळी

१) अँटिऑक्सिडंट्स असतात.

२) वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदतरूप.

३) ग्लायसेमिक इंडेक्स कमी.

४) फायबरयुक्त.

५) प्रथिनयुक्त.

विविध डाळी आणि पोषणमूल्ये

१) चणाडाळ

  • प्रथिनयुक्त

  • लोह, कॅल्‍शियमयुक्त

  • फायबरयुक्त

२) मसूर डाळ

  • प्रथिनयुक्त

  • लोह, कॅल्शियमयुक्त

  • झिंक, मॅग्नेशियमसारखी क्षार देणारी

३) तूर डाळ

  • ऊर्जा मिळते

  • प्रथिनयुक्त

  • पचनास सोपी

  • झिंक, मॅग्नेशियमयुक्त

  • रक्तातील शर्करा मर्यादित राखते

४) उडीद डाळ

  • प्रथिनयुक्त

  • जीवनसत्त्व बी; प्रथिनयुक्‍त

  • पोटॅशियम, कॅल्शियम, लोहयुक्त

५) मूग डाळ

  • पचनासाठी हलकी

  • ग्लायसेमिक इंडेक्स कमी - क्षार व फायबर‌युक्त

अख्खे मूग, चवळी, चणा, मसूर, उडीद, तूर, हुलगा इत्यादी पदार्थ सालासकट असल्यानं फायबरयुक्त, क्षार व प्रथिनयुक्त असतात. त्यांचा वापर त्यांना मोड आणून केल्यास त्यांचं योग्य प्रकारे शोषण होण्यास मदत होते.

आहारातील सोप्या टिप्स

डाळी, उसळीचा वापर करताना

  • डाळी किमान पाच-सात तास भिजवून घेतल्यास डाळींमधील स्टार्चचं विघटन जलद होतं आणि पचन सुलभ होतं.

  • अपूर्ण इन्सेन्शियल अमिनो अॅसिड्समुळे नेहमी डाळी व उसळी धान्यांबरोबर खाव्यात. म्हणजे शोषण होण्यास व चांगली प्रथिने शरीराला मिळण्यास मदत होते.

  • डाळी- उसळींची पोषणमूल्ये वाढवण्यासाठी त्यामध्ये हिंग, ओवा, जिरं, धणे, आलं-लसूण इत्यादी घटकांचा वापर करावा.

  • पचन चांगले होण्यासाठी डाळींमध्ये तूप किंवा ओला नारळ किंवा खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा.

  • सालासकट कडधान्ये खाताना त्यांना मोड आणावेत.

  • डाळी व उसळी आपण आहारात भाज्यांमध्ये व्यंजन म्हणून, पीठ म्हणून, कढण, सूप स्वरूपात, आंबवून, उकडून, सॅलड-कोशिंबीर यांमध्ये घेऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT